United Nations & USA statement on Bangladesh Violence  Dainik Gomantak
ग्लोबल

बांगलादेशात हिंदूंवर हल्ल्याचं सत्र सुरूच,UN सह अमेरिकेने केला निषेध

संयुक्त राष्ट्र संघाने बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराचा निषेध केला आहे. (Bangladesh Violence)

दैनिक गोमन्तक

बांगलादेशात (Bangladesh) दुर्गापूजेदरम्यान सुरू झालेला हिंसाचार (Bangladesh Violence) थांबायचे नाव घेत नाही आहे. पूजा मंडप आणि मंदिरांवर हल्ल्यांच्या विरोधात अल्पसंख्यांक समुदायांकडून सुरू असलेल्या निषेधाच्या दरम्यान रविवारी रात्री हल्लेखोरांनी रंगपूर (Rangpur Violence ) जिल्ह्यात 66 हिंदू घरांचे नुकसान केले आणि सुमारे 20 घरांना आग लावली आहे. दुसरीकडे, इस्कॉनने पंतप्रधान शेख हसीना यांना हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची आणि हिंदूंना सुरक्षा पुरवण्याची विनंती केली आहे.(United Nations & USA statement on Bangladesh Violence)

संयुक्त राष्ट्र संघाने बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे की, ' बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर होणारे हल्ले देशाच्या संविधानात समाविष्ट केलेल्या मूल्यांच्या विरोधात आहेत. पंतप्रधान शेख हसीना सरकारने या घटनांची निष्पक्ष चौकशी करण्याची गरज आहे.'असे देखील UN ने सांगितले आहे. आठवड्याच्या शेवटी रंगपूरच्या उत्तर जिल्ह्यात हिंसाचाराच्या उद्रेकामुळे बांगलादेशात जातीय तणाव अधिकच वाढताना दिसत आहे.

देशातील सोशल मीडियावरील द्वेषयुक्त भाषणामुळे बांगलादेशातील अलिकडे हिंदूंवर होणारे हल्ले संविधानाच्या मूल्यांच्या विरोधात आहेत आणि ते थांबवण्याची गरज आहे. आम्ही सरकारला विनंती करतो की अल्पसंख्यांकांची सुरक्षा आणि निष्पक्ष चौकशीची खात्री करा.असे आवाहन बांगलादेशातील संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक मिया सेप्पो यांनी केले आहे.त्याचबरोबर सर्वसमावेशक सहिष्णु बांगलादेश मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वांनी हात जोडण्याचे आवाहन केले आहे.

बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराने आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आहे. अमेरिकेनेही हिंदूंवरील या हल्ल्याचा निषेध केला आहे.

सूत्रांनी द हिंदूला सांगितले की, इस्कॉनसह सर्व समुदायाच्या नेत्यांनी सोमवारी संध्याकाळी ढाका येथील भारतीय मिशनमध्ये भारतीय उच्चायुक्त विक्रम डोराईस्वामी यांची भेट घेतली आहे. ढाकास्थित संयुक्त राष्ट्रसंघाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा हा नाराजीचा संदेश योनीमागचं कारण म्हणजेच आता संपन्न झालेल्या दुर्गा पूजेच्या समारंभात अल्पसंख्यांक हिंदूंना लक्ष्य करणाऱ्या सांप्रदायिक हिंसाचारामुळे आला आहे. रंगपूर जिल्ह्यातील पीरगंजमध्ये रविवारी रात्री एका मच्छीमारांच्या गावाला सोशल मीडिया पोस्टवर आग लावण्यात आल्यानंतर हिंसाचार झाला.

बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समुदायावरील हल्ल्याच्या अमेरिकेनेही निषेध केला आहे.अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, धर्म किंवा श्रद्धेचे स्वातंत्र्य हा मानवी हक्क आहे. जगभरातील प्रत्येक व्यक्ती, त्यांचा धार्मिक संबंध किंवा श्रद्धा विचारात न घेता, महत्त्वपूर्ण सण साजरे करण्यासाठी सुरक्षित आणि समर्थित वाटले पाहिजे. बांगलादेशातील हिंदू समुदायावरील हल्ल्यांच्या अलीकडील अहवालांचा परराष्ट्र विभाग निषेध करतो,असे म्हणत अमेरिकेने या घटनेचा निषेध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

SCROLL FOR NEXT