unique city in the world where death is banned know the reason behind it Dainik Gomantak
ग्लोबल

जगातील अनोखे शहर जिथे गेल्या 70 वर्षात एकाचाही मृत्यू नाही

जन्म (Birth) आणि मृत्यूवर (Death) कोणाचाच ताबा नसतो, असं अनेकदा म्हटलं जातं, हे कडू सत्य आहे ज्याचा सर्वांनाच सामना करावा लागतो.

दैनिक गोमन्तक

जन्म (Birth) आणि मृत्यूवर (Death) कोणाचाच ताबा नसतो, असं अनेकदा म्हटलं जातं, हे कडू सत्य आहे ज्याचा सर्वांनाच सामना करावा लागतो, पण तुम्हाला माहित आहे का की जगात एक असं शहर आहे ज्याने मृत्यूला जिंकलं आहे. हे ऐकून तुम्हाला क्षणभर आश्‍चर्य वाटले असेल, पण हे अगदी खरे आहे.

आम्ही बोलतोय नार्वे (Norway) मधील लॉन्गयरब्येन (Longyearbyen) या छोट्याशा शहराविषयी, या बेटावर, हिवाळ्यात तापमान इतके कमी होते की जिवंत राहणे सोपे होते आणि म्हणूनच येथे मरण्याची परवानगी नाही. गेल्या 70 वर्षांत येथे कोणीही मरण पावले नाही.

आता आम्ही तुम्हाला सांगतो की मृत्यूला इथे येण्यास का मनाई आहे. थंडीमुळे अनेक वर्षे मृतदेह तसाच पडून राहतो. तीव्र थंडीमुळे सडत मृतदेह नाही. यामुळे मृतदेह नष्ट करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मृतदेह फार काळ नष्ट होत नाहीत.

थंडीमुळे मृतदेह नष्ट होत नाही

काही वर्षांपूर्वी जेव्हा शास्त्रज्ञांनी एका शरीरावर संशोधन केले तेव्हा असे आढळून आले की 1917 मध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू इन्फ्लूएंझामुळे झाला, त्याच्या शरीरात इन्फ्लूएंझा विषाणू होता. त्यामुळे या भागात रोगराई पसरण्याची शक्यता होती. या तपासणीनंतर प्रशासनाने या भागात लोकांच्या मृत्यूस बंदी घातली आहे.

यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. इन्फ्लूएंझा (Influenza) विषाणू जसा होता तसाच पडून असल्याने लोकांना रोगराईचा धोका होता. यानंतर प्रशासनाने शहरात मृत्यू बंदी घातली होती. आता जर एखाद्या व्यक्तीचा येथे मृत्यू होणार असेल किंवा त्याला आपत्कालीन परिस्थिती असेल तर त्या व्यक्तीला हेलिकॉप्टरच्या साहाय्याने देशाच्या दुसऱ्या भागात नेले जाते आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर तेथे त्याचे अंतिम संस्कार केले जातात.

या शहरात वर्षानुवर्षे संशोधन करणारे वैज्ञानिक आणि साहसी पर्यटकांचा मेळा भरतो. सर्वसामान्यांना या ठिकाणी जायला आवडत नाही. 2000 हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला विमान किंवा हेलिकॉप्टरने दुसऱ्या ठिकाणी नेले जाते आणि मृत्यूनंतर तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT