जगभरात अफगाणिस्तानचा (Afghanistan) मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे मात्र युनिसेफने मुलांवर लक्ष केंद्रित करायला लावणारा एक अहवाल प्रसिध्द केला आहे. युनिसेफच्या या नवीन अहवालात म्हटले आहे की, दक्षिण आशियातील (South Ashia) चार देशांमध्ये भारताचाही समावेश आहे जिथे हवामान बदलामुळे मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता गंभीररित्या धोक्यात आली आहे. युनिसेफने मुलांवर लक्ष केंद्रित करणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. याला क्लायमेट क्रायसिस अ चाईल्ड राईट्स क्रायसिस: चिल्ड्रेन एट रिस्क इंडेक्स (सीसीआरआय) असे नाव देण्यात आले आहे. या अहवालात, चक्रीवादळ आणि उष्णतेच्या लाटांसारख्या पर्यावरणीय धोक्यांपासून मुलांचे संऱक्षणाच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भारत या चार दक्षिण आशियाई देशात जेथे हवामान संकटाच्या परिणामांमुळे मुलांना सर्वाधिक धोका आहे. या देशांची क्रमवारी अनुक्रमे 14 वी, 15 वी, 25 वी आणि 26 वी आहे. सीसीआरआयने भारताला 33 अत्यंत उच्च जोखमीच्या देशांमध्ये स्थान दिले आहे जिथे पूर आणि वायू प्रदूषणासारख्या वारंवार होणाऱ्या पर्यावरणीय धोक्यांमुळे महिला आणि मुलांसाठी सामाजिक-आर्थिक दुष्परिणाम होतात. चार दक्षिण आशियाई देशांसह 'अत्यंत उच्च जोखीम' म्हणून वर्गीकृत 33 देशांपैकी सुमारे एक अब्ज मुले राहतात.
जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ झाल्यास 600 दशलक्षांहून अधिक भारतीयांना येत्या काही वर्षांत तीव्र जलसंकटाला सामोरे जावे लागेल असा अंदाज आहे, त्याच वेळी शहरी भागात फ्लॅश फ्लडचा धोका देखील वाढेल. वर्ष 2020 मध्ये, जगातील सर्वाधिक प्रदूषित हवा असलेल्या 30 शहरांपैकी 21 शहरे भारतात होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.