UN grants 45 million dollar for Afghanistan health system  Dainik Gomantak
ग्लोबल

UN ची अफगाणिस्तानला आरोग्य व्यवस्थेसाठी 45 दशलक्ष डॉलरची मदत

आरोग्य सेवा यंत्रणा कोलमडण्यापासून रोखण्यासाठी UN संस्थेने आपत्कालीन निधीसाठी 45 दशलक्ष डॉलर देण्याची घोषणा केल्याचे समजत आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचा (Taliban) ताबा आल्यांनतर त्याचा परिणाम सर्वदूर दिसून येत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) यापूर्वीही अनेक वेळा महिला आणि मुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. आणि आता संयुक्त राष्ट्र संघाने अफगाणिस्तानच्या आरोग्य व्यवस्थेसाठी (Health Department) आपत्कालीन निधी जारी केला आहे. आरोग्य सेवा यंत्रणा कोलमडण्यापासून रोखण्यासाठी संस्थेने आपत्कालीन निधीसाठी 45 दशलक्ष डॉलर देण्याची घोषणा केल्याचे समजत आहे. (UN grants 45 million dollar for Afghanistan health system)

अहवालानुसार, निधी जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफला जाईल. यासह, कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांसह इतर आरोग्य सेवा सुविधा वर्षाच्या अखेरीपर्यंत कार्यान्वित केल्या जातील. संयुक्त राष्ट्र संघ अफगाणिस्तानच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

दरम्यान तालिबानने अफगाणिस्तानात कब्जा मिळवल्यानंतर अनेक गोष्टी आणि तालिबानी निर्णय समोर येत आहेत. तालिबान्यांनी पीएचडीचे कुलगुरू महंमद उस्मान बाबरी यांना काढून टाकल्यानंतर आणि त्यांच्या जागी बीए पदवीधारक मोहम्मद अशरफ घैरत यांची नियुक्ती केल्यानंतर काबूल विद्यापीठातील जवळपास 70 अध्यापन कर्मचाऱ्यांनी सहाय्यक प्राध्यापकांसह राजीनामा दिल्याची माहिती देखील समोर येत आहे.

तर दुसरीकडे तालिबानने महिलांच्या हक्कावर गदा आणली आहे तालिबानने अलीकडेच सर्व महिला आणि तरुण मुलींसाठी जुनी आचारसंहिता लागू केली आहे. त्यांच्यावर खेळ आणि इतर उपक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.द न्यूज इंटरनॅशनलच्या मते, तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानातून उद्भवणारे असे लिंगभेद शांतता राखू शकत नाहीत. तालिबानच्या विचारसरणीत त्यांच्यामध्ये लिंगभेद समाविष्ट आहे. हे अफगाण महिलांचे भविष्य दर्शवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT