Ukrainian President Volodymyr Zelenskyy  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine Conflict: युक्रेनचे अध्यक्ष म्हणाले...'हम डरते नहीं हैं'

रशियाने (Russia) युक्रेनियन लुहान्स्क आणि डोनेत्स्क या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

रशियाने युक्रेनियन लुहान्स्क आणि डोनेत्स्क या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे. रशियाच्या या निर्णयामुळे, युक्रेनवरील आक्रमणादरम्यान पाश्चात्य देशांच्या भीतीमध्ये तणाव (Russia Ukraine Conflict) आणखी वाढेल. या निर्णयावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही घाबरत नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. झेलेन्स्की यांना अजूनही नाटो देशांकडून निःसंदिग्ध समर्थनाची अपेक्षा आहे. रशियाच्या या निर्णयावर अमेरिकेकडूनही (America) तीव्र प्रतिक्रिया आली आहे. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी (Jane Sackie) यांनी सांगितले की, अध्यक्ष जो बायडन लवकरच अमेरिकन नागरिकांना लुहान्स्क आणि डोनेस्तक प्रदेशात गुंतवणूक करण्यापासून रोखणारा आदेश जारी करतील. (Ukrainian President Volodymyr Zelenskyy Says He Is Not Afraid Of Russian Repression)

दरम्यान, पुतीन यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर ही घोषणा केली, ज्यामुळे रशियाला मॉस्को समर्थित बंडखोर आणि युक्रेनियन सैन्य यांच्यातील संघर्षासाठी मुक्तपणे सैन्य आणि शस्त्रे पाठवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रशिया (Russia) युक्रेनवर केव्हाही हल्ला करु शकतो. विशेष म्हणजे या हल्ल्याचे निमित्त म्हणून पूर्व युक्रेनमधील संघर्षाचा वापर होऊ शकतो, अशी भीती पाश्चात्य देशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रशिया-युक्रेन तणावाच्या ताज्या घडामोडींनंतर जागतिक बाजारपेठेत मोठी घसरण झाली

रशिया-युक्रेन तणावाच्या ताज्या घडामोडींनंतर जागतिक बाजारपेठेत मोठी घसरण दिसून येत आहे. या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची सोमवारी तातडीची बैठक होणार आहे. पुतीन यांच्या आदेशानंतर युनायटेड किंग्डमने रशियावर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. रशियाच्या ताज्या निर्णयावर परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांनी ट्विट केले की, 'यावरुन रशियाने चर्चेचा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT