Russia-Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: धक्कादायक! सैनिकांच्या छातीत सापडला जिवंत बॉम्ब, डॉक्टरही झाले चकीत

डॉक्टरांनी एका रशियन सैनिकाच्या छातीतून जिवंत बॉम्ब काढला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) मागील अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. डॉक्टरांनी एका रशियन सैनिकाच्या छातीतून जिवंत बॉम्ब काढला आहे. पण, जिंवत बॉम्ब सैनिकाच्या छातीत कसा पोहोचला, त्याचा स्फोट का झाला नाही, हे मात्र डॉक्टरांना समजू शकलेले नाही.

डेली स्टार या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, निकोले पासेंको असे या रशियन सैनिकाचे नाव आहे. निकोले हा रशियन सैनिक युक्रेनच्या सैन्याशी लढत असताना आघाडीवर होता, याचदरम्यान निकोले गंभीर जखमी झाले. रशियन सैनिकाला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांना त्याच्या छातीत जिवंत बॉम्ब आढळून आला. मात्र, जिवंत बॉम्ब त्याच्या छातीत कसा पोहोचला हे डॉक्टर किंवा स्वत: सैनिक देखील सांगू शकलेले नाहीत.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने देखील गुरुवारी या घटनेची दखल घेतली आहे. रशियाच्या सेंट्रल मिलिटरी डिस्ट्रिक्टमधील मँड्रिक सेंट्रल मिलिटरी क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये सैनिकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सैनिकाच्या छातीत जखम झाली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बॉम्बचा स्फोट न होता तो बॉम्ब चमत्कारिकरीत्या त्याच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले.

सैनिकांच्या छातीतून शस्त्रक्रिया करून बॉम्ब काढताना स्फोट होण्याची शक्यता होती. पण, डॉक्टरांनी काळजीपूर्वक जखमी रशियन सैनिकाच्या छातीतून बॉम्ब बाहेर काढला. रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) मागील अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशांच्या 2 लाखांहून अधिक सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले असून लाखो लोक बेघर झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

SCROLL FOR NEXT