Russian-Ukraine War dainikgomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: युक्रेनच्या सैन्याचा 'जुगाड' असे देणार रशियाला उत्तर पाहा व्हिडिओ

Russia-Ukraine War: दीड वर्षानंतरही रशिया आणि युक्रेन मधले हे युद्ध अखंड सुरुच आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दीड वर्षापासून युद्ध चालू आहे. यादरम्यान, रशियाच्या सैन्याने युक्रेनमध्ये मोठे नुकसान केले आहे. तरीही युक्रेन मोठ्या धैर्याने या युद्धाचा सामना करताना दिसत आहे.

रशिया-युक्रेनच्या युद्धादरम्यान, युक्रेनच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. युक्रेनच्या सैन्यालादेखील पुरेशी हत्यारे नसल्यानेदेखील मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

अमेरिकेसोबत अनेक देश युक्रेनला हत्यारांचा पुरवठा करत असले तरीही युक्रेनला ही हत्यारे कमी पडत आहेत. आता या संकटातून बाहेर निघण्यासाठी युक्रेनच्या सैन्याने एक क्लृप्तीचा वापर केला आहे.

एके-74 असाल्ट राइफलींचा वापर करुन एक नवीन हत्यार बनवले आहे. हे हत्यार युक्रेनचे सैन्य रशियाच्या ड्रोन विरुद्ध वापरत आहेत. हे हत्यार मल्टीबैरल मशीनगन सारखे दिसत असून युक्रेनच्या सैन्यासाठी मोठे उपयुक्त ठरत आहे. आता याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, सर्व सहा एके-74 असॉल्ट रायफल्स लोखंडी फ्रेममध्ये गोल आकारात अशा प्रकारे सेट केल्या आहेत की त्या एकाच वेळी चालवता येतील.

मल्टीबॅरल मशीनगनसारखे दिसणारे हे शस्त्र ट्रायपॉडवर ठेवण्यात आले होते आणि ते ड्रोनवर हल्ला करताना दिसत आहे. मात्र, गोळीबार केल्यानंतर ड्रोन पडला की नाही, हे व्हिडिओमध्ये दिसत नाही.

दीड वर्षानंतरही रशिया आणि युक्रेन मधले हे युद्ध अखंड सुरुच आहे. या कालावधीत रशियाने युक्रेनमधील शहरेच्या शहरे उद्धवस्त केली आहेत. आता या युद्धाचा शेवट कधी आणि कसा होणार हा संपूर्ण जगासमोर पडलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT