Russian boats  Dainik Gomantak
ग्लोबल

Video: Ukraine ने उडवल्या दोन रशियन नौका, ड्रोनने केली कामगिरी

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. यातच आता युक्रेनने सोमवारी काळ्या समुद्रातील स्नेक आयलंडजवळ दोन रशियन नौका उदध्वस्त केल्याचं म्हटलं आहे. हे तेच ठिकाण आहे, जिथे युद्धाच्या सुरुवातीलाच रशियाने (Russia) युक्रेनियन सैन्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते, तेव्हा त्यांनी नकार दिला होता. (Ukraine says it has wrecked two Russian boats near Snake Island in the Black Sea on)

युक्रेनच्या (Ukraine) संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "आज सकाळी स्नेक बेटावर दोन रशियन रॅप्टर बोटी उदध्वस्त करण्यात आल्या आहेत." संरक्षणमंत्र्यांनी एका छोट्या लष्करी विमानात स्फोट झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, तुर्कस्तानमध्ये (Turkey) बनवलेल्या ड्रोनबद्दल बोलताना युक्रेनच्या लष्कराचे कमांडर इन चीफ म्हणाले, ''बायोचॅरेक्टर काम करत आहेत. रॅप्टर गस्ती नौका तीन क्रू आणि 20 लोक घेऊन जाऊ शकतात. ते सहसा मशीन गनसह सुसज्ज असतात आणि लँडिंग ऑपरेशनमध्ये उपयुक्त असतात.''

तसेच, युक्रेनियन सैनिकांनी रशियन युद्धनौकेसमोर शस्त्रे खाली ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर युक्रेनियन सैनिक आणि रशियन सैनिकांमधील रेडिओ संभाषण व्हायरल झाल्यानंतर स्नेक आयलंडजवळ युक्रेनियन सैनिकांनी ही कामगिरी केली.

ऑडिओ क्लिपमध्ये रशियन सैनिक म्हणतो की, "ही रशियन युद्धनौका आहे. रक्तपात टाळण्यासाठी मी तुम्हाला शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण करण्यास सांगतो. अन्यथा तुमच्यावर बॉम्ब हल्ला केला जाईल."

स्पेक्टेटर इंडेक्सने ट्विट करत म्हटले की, "स्नेक आयलंडवर रशियन युद्धनौकांना 'गो फ***' म्हणणारे युक्रेनियन सैनिक जिवंत असून ते कैदी आहेत."

दुसरीकडे, रशियाने मॉस्क्वावर स्फोट झाल्याचे सांगितल्यानंतर एप्रिलच्या मध्यात मॉस्क्वा हे रशियन जहाज काळ्या समुद्रात बुडाले होते, असा दावा युक्रेनने केला होता. त्यावेळी युक्रेनने सांगितले की, युद्धनौका आमच्या क्षेपणास्त्रांनी पाडण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: इंग्लंडला डबल झटका! आधी कांगारुंनी मैदानात दिली मात, नंतर WTC पॉइंट टेबलमध्ये झाली घसरण; जाणून घ्या भारताची सध्याची स्थिती

गोव्यात जमीनमालकांना झटका! मुंडकारांना हक्क मिळेपर्यंत जमिनीची विक्री होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

SCROLL FOR NEXT