Arsenalna Metro Station Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनमधील मेट्रो स्टेशन पाहिलयं का? जाणून घ्या या देशातील मनोरंजक तथ्ये

युक्रेनची लोकसंख्या किती आहे, चलन, धर्म, भाषा आणि काही मनोरंजक तथ्ये काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.

दैनिक गोमन्तक

रशियाने युक्रेनच्या दोन भागांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. रशियाची युक्रेनशी सीमा सामायिक आहे. युक्रेनच्या पूर्वेला रशियाने स्वतंत्र घोषित केलेले दोन प्रांत आहेत. लुहान्स्क आणि डोनेस्तक अशी त्यांची नावे आहेत. युक्रेनची (Ukraine) लोकसंख्या किती आहे, चलन, धर्म, भाषा आणि काही मनोरंजक तथ्ये काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो. (Ukraine-Russia Latset News Update)

युक्रेनची लोकसंख्या

युक्रेन हा जगातील 46 वा आणि युरोपमधील दुसरा सर्वात मोठा देश आहे. युक्रेनचे एकूण क्षेत्रफळ सुमारे सहा लाख चौरस किमी आहे. देशाची एकूण लोकसंख्या ४४.९ दशलक्ष म्हणजे ४.४९ कोटी आहे. युक्रेनच्या लोकसंख्येपैकी सुमारे 78 टक्के लोक मूळ युक्रेनियन आहेत, तर 22 टक्के लोकसंख्या इतर देशांतील आहे. 100 महिलांमागे केवळ 86.3 पुरुष आहेत.

युक्रेनचे चलन, भाषा

युक्रेनचे सर्वात मोठे शहर आणि राजधानी कीव आहे. या शहरात सर्वाधिक लोकसंख्या (२.८ दशलक्ष) राहते. येथील मुख्य धर्म ख्रिश्चन आहे, अधिकृत भाषा युक्रेनियन आहे. जरी इतर अनेक भाषा देखील बोलल्या जातात. देशाचे अधिकृत चलन युक्रेनियन रिव्निया आहे.

भारत ते युक्रेन अंतर

नवी दिल्ली ते युक्रेन हे अंतर सुमारे 5000 किमी आहे. उड्डाणासाठी सुमारे पाच तास लागतात.

युक्रेन कधी स्वतंत्र झाले?

24 ऑगस्ट 1991 रोजी सोव्हिएत युनियन तुटल्यानंतर युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 1922 मध्ये युक्रेन सोव्हिएत युनियनचा सदस्य झाला. या देशाच्या ईशान्येला व पूर्वेस रशिया, वायव्येस बेलारूस, पश्चिमेस पोलंड व स्लोव्हाकिया या देशांच्या सीमा आहेत.

युक्रेन जगभर प्रसिद्ध आहे

जगातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन युक्रेनमध्ये आहे. त्याला युक्रेनचे आर्सेनाल्ना मेट्रो स्टेशन म्हणतात. युक्रेनचा साक्षरता दर सुमारे 99.8 टक्के आहे. हा जगातील चौथ्या क्रमांकाचा साक्षरता दर आहे. सरासरी आयुर्मान दर सुमारे 71.48 वर्षे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, युक्रेन हा जगातील सहाव्या क्रमांकाचा मद्य सेवन करणारा देश आहे. फुटबॉल आणि बॉक्सिंग हे येथील सर्वात लोकप्रिय खेळ आहेत. युक्रेन हा जगातील पहिला देश आहे ज्याने आपले आण्विक शस्त्रास्त्र सोडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT