Rishi Sunak Dainik Gomantak
ग्लोबल

UK PM Race: ब्रिटीश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक 118 मतांसह अव्वल

Rishi Sunak: ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी आपला दावा अधिक मजबूत केला आहे.

दैनिक गोमन्तक

UK PM Race: ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी आपला दावा अधिक मजबूत केला आहे. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मते मिळाली. यासह माजी मंत्री कॅमी बडेनोक पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यांना 59 मते मिळाली. त्यामुळे आता केवळ तीन उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मंत्री पेनी मॉर्डाउंट यांना 92 आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांना 86 मते मिळाली आहेत. आता पुढील फेरीत सुनक, पेनी मॉर्डाँट आणि लिझ ट्रस यांच्यात सामना होणार आहे.

दरम्यान, गुरुवारपर्यंत केवळ दोनच उमेदवार अंतिम यादीत स्थान मिळवू शकतील. सोमवारी झालेल्या तिसऱ्या फेरीच्या मतदानात माजी अर्थमंत्री (Finance Minister) सुनक यांना 115 मते मिळाली. त्याचवेळी दुसऱ्या फेरीत 101 तर पहिल्या फेरीत 88 मते मिळाली. सुनक सर्व टप्प्यांवर अव्वल राहिले आहेत.

दुसरीकडे, कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 876 सदस्यांमध्ये तीन दिवसांपूर्वी 'YouGov' ने केलेल्या सर्वेक्षणात पेनी मॉर्डंट पुढे असल्याचा दावा करण्यात येत आहे. सर्वेक्षणानुसार, मॉर्डंटला 27 टक्के सदस्यांचा पाठिंबा देखील आहे. कामी बेडिनोक 15 टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत, तर ऋषी सुनक आणि लिट ट्रस 13 टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावरती आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT