UAE Highway Truck Accident: संयुक्त अरब अमिरातीतील फुजैराह शहरात अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारा अपघात घडला, यामध्ये भारतीय नागरिकांसह तब्बल 14 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. एका अनियंत्रित ट्रकने समोरुन जाणाऱ्या तब्बल 23 वाहनांना एकामागून एक जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, या अपघातानंतर (Accident) ट्रकमध्ये अचानक आगीचा भडका उडाला, ज्याने पाहता पाहता आसपास उभ्या असलेल्या आणि ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या इतर गाड्यांनाही आपल्या कवेत घेतले.
युएईच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी अपघातात एकूण 5 ट्रकसह 23 वाहनांचे मोठे नुकसान झाले असून आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशामक दल आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. आगीत गंभीररित्या भाजल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे देखील कठीण झाले. फुजैराह पोलिसांनी जखमी झालेल्या सर्व 30 जणांना तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेत काही स्थानिक नागरिकांसह भारतीय नागरिकांचाही मृत्यू झाल्याची पुष्टी यूएईमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने केली. भारतीय दूतावासाचे अधिकारी स्थानिक प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असून, पीडित भारतीय कुटुंबांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य दिले जात आहे. या महाभयंकर अपघातामुळे युएईमध्ये शोककळा पसरली असून परदेशी लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.