Twitter | Elon Musk  Dainik Gomantak
ग्लोबल

Twitter Blue Tick: एलन मस्कची पुन्हा मोठी घोषणा, आजपासून ब्लू टिक...

ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Elon Musk on Twitter Blue Tick: एलन मस्कने पुन्हा एक मोठी घोषणा केली आहे. तुम्ही देखील ट्विटर वापरकर्ते असाल तर तुम्हाला आता ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागतील.

सीईओ एलन मस्क यांनी म्हटले आहे की जे वापरकर्ते पैसे देत नाहीत त्यांना ब्लू टिकचा लाभ मिळणार नाही. यामुळे तुमच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे.

  • आजपासून ब्लू टिक काढून टाकण्यात येणार

एलन मस्कने सांगितले होते की 20 एप्रिलपासून ट्विटरवरील लेगसी ब्लू टिक मार्क व्हेरिफाईड अकाऊंटमधून काढून टाकले जाईल. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "20 एप्रिलपासून लेगसी ब्लू चेकमार्क काढले जातील." तसेच, जर ब्लू टिक आवश्यक असेल तर मासिक शुल्क भरावे लागेल, त्यानंतरच खात्यावर ब्लू टिक अॅक्टिव केले जाईल.

  • निर्णयाचा काय परिणाम होईल

20 एप्रिलपासून ब्लू टिक चेकमार्क असलेल्या युजर्सच्या खात्यातून ब्लू टिक काढून टाकला जाईल आणि फक्त तेच वापरकर्ते जे ट्विटर ब्लूचे सदस्य आहेत ते ठेवू शकतील. तुम्हाला तुमच्या ट्विटर अकाऊंटसाठी ब्लू टिक टिकवून ठेवायचे असेल, तर तुम्हाला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल.

  • ट्विटरला ब्लू टिक मार्क देण्याची प्रक्रिया 2009 मध्ये सुरू

ट्विटरने ब्लू टिक मार्क देण्यास 2009 मध्ये सुरुवात केली. याद्वारे राजकीय नेते, सेलिब्रिटी इत्यादी सेलिब्रिटींच्या सत्यापित खात्यावर ब्लू टिक दिली गेली. कंपनीने यापूर्वी ब्लू टिकसाठी शुल्क आकारले नसले तरी एलन मस्क ट्विटरचे मालक बनताच त्यांनी ट्विटरच्या या सेवेसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली होती.

  • ब्लू टिक टिकवून ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना द्यावे लागतील पैसे

अलीकडेच एलन मस्कने ट्विटरच्या लोगोचा आयकॉनिक ब्लू बर्ड काढून त्याजागी कुत्र्याचा लोगो लावला होता आणि यामुळे वापरकर्ते आश्चर्यचकित झाले होते. ट्विटरचे मालक झाल्यापासून एलन मस्क हे ट्विटरबाबत सतत नवनवे निर्णय घेत असतो आणि युजर्सला आश्चर्याचे धक्के देत राहतो.

ट्विटरचे मालक बनताच त्यांनी ब्लू टिक वापरकर्त्यांसाठी पेमेंट गोळा करण्याची प्रणाली जाहीर केली होती. तेव्हापासून ट्विटरच्या लीगेसी ब्ल्यू टिक वापरकर्त्यांच्या खात्यांमधून ब्लू टिक्स कधी हटवल्या जातील याबद्दल अटकळ बांधली जात होती. आता एलोन मस्कने त्याची तारीख जाहीर केली आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT