Turkey Izmir Steel Factory Blast 16 Dead: तुर्कियेमधील इझमिर शहरातून काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली. येथील एका स्टीलच्या कारखान्यात अचानक झालेल्या भीषण स्फोटात तब्बल 16 कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर 13 हून अधिक कामगार गंभीररीत्या जखमी झाले. हा स्फोट इतका प्रचंड आणि विनाशकारी होता की काही क्षणांतच संपूर्ण कारखाना परिसरात आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले. या अचानक झालेल्या घटनेमुळे कारखान्यात एकच घबराट पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात रुटीन मेंटेनन्सचे काम सुरु असताना ही भयंकर दुर्घटना घडली. कामगार क्रेनच्या साहाय्याने कारखान्यातील एक बॉयलर बदलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्याचवेळी अचानक क्रेनचे संतुलन बिघडले आणि ती थेट धगधगत्या भट्टीमध्ये जाऊन कोसळली. भट्टीतील अत्यंत उच्च तापमान आणि वितळलेल्या लोखंडाशी क्रेनचा संपर्क येताच एक थर्मल ब्लास्ट झाला. या स्फोटाच्या तीव्रतेमुळे आसपास काम करत असलेले सर्व कामगार थेट आगीच्या विळख्यात सापडले आणि त्यांना सावरण्याची साधी संधीही मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, अग्निशामक दल आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत मलब्याखालून जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयांमध्ये (Hospital) उपचारासाठी दाखल केले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. सुरक्षेत झालेल्या या गंभीर चुकीची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.