Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: "अपघात झाला तेव्हाच पठ्ठ्याला जाग आली", ट्रक अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल; नेटकरीही चकीत, म्हणाले...

Truck Driver Video: एका ट्रक चालकासोबत घडली, जो गाडी चालवत असतानाच अचानक झोपी गेला आणि केवळ दोन मिनिटांची झोप त्याला चांगलीच महागात पडली.

Manish Jadhav

Truck Driver Video: वाहन चालवण्यापूर्वी पुरेशी झोप न घेणे हे अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. अनेकदा ड्रायव्हर्स डिलीव्हरी वेळेवर पोहोचवण्यासाठी जास्त वेळ गाडी चालवतात आणि पुरेशी विश्रांती घेत नाहीत. रस्ता लांब आणि सरळ असताना अनेकदा चालकाला गाडी चालवताना झोप येऊ लागते. दुर्दैवाने यामुळे अपघाताचा धोकाही वाढतो. अशीच एक घटना एका ट्रक चालकासोबत घडली, जो गाडी चालवत असतानाच अचानक झोपी गेला आणि केवळ दोन मिनिटांची झोप त्याला चांगलीच महागात पडली. जेव्हा त्याचे डोळे उघडले, तेव्हा भीषण अपघात होऊन ट्रक पलटी झाला होता.

आधी हा व्हिडिओ पाहा

डॅशकॅम व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, या घटनेचा थरारक व्हिडीओ 'एक्स' प्लॅटफॉर्मवर @VehicleTracker8 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एक धक्कादायक डॅशकॅम व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे, ज्यामध्ये झिम्बाब्वेचा एक ट्रक चालक सुमारे दोन मिनिटे गाडी चालवताना झोपलेला दिसतो. डॅशकॅममध्ये ड्रायव्हर झोपताना दाखवले आहे, तर त्याचा ट्रक रस्त्यावरुन खाली उतरुन पलटी होतो.'

काय दिसले व्हिडिओमध्ये?

ट्रकला आत आणि बाहेर अशा दोन्ही बाजूंनी कॅमेरे लावलेले होते. यामुळे रस्त्याचे दृश्य आणि ट्रकच्या आत झोपलेल्या चालकाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ट्रक रस्त्यावर व्यवस्थित चालताना दिसतो. पण काही वेळातच चालकाचे स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकचे चाक रस्त्यावरुन खाली उतरते. रस्त्यावरुन खाली उतरताच ट्रक चालकाला जाग येते, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. असंतुलित झालेला ट्रक पूर्णपणे पलटी (Overturn) होऊन अपघातग्रस्त होतो. हा व्हिडीओ चालकांना पुरेशी विश्रांती घेण्याचा गंभीर इशारा देतो.

सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

दुसरीकडे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • एका युजरने लिहिले, "झोप येण्याबद्दल एक गोष्ट खरी आहे, तुमचे मन तुम्हाला खोटे सांगते की फक्त दोन सेकंदांसाठी डोळे बंद करुया."

  • दुसऱ्या युजरने म्हटले, "देवाने सांगितले, 'बस झाले, आता कोणाला मारण्यापूर्वी जागे व्हा!'."

  • आणखी एका युजरने कंपनीला दोष दिला, "मी लालची कंपन्यांना दोषी मानतो. ट्रकवर नेहमी दोन ड्रायव्हर असले पाहिजेत."

  • एका युजरने तर, "ट्रकच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवत आलेल्या व्यक्तीला कळलेच नसेल की तो मृत्यूच्या किती जवळून गेला होता," अशी भीती व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT