New York Daainik Gomantak
ग्लोबल

Top 10 Millionaires Cities: या दहा शहरांमध्ये राहतात जगातील सर्वाधिक करोडपती

New York: सर्वाधिक करोडपती असलेल्या पहिल्या दहा शहरांपैकी पाच शहरे अमेरिकेतील आहेत.

दैनिक गोमन्तक

Top 10 Millionaires Cities: न्यूयॉर्क, टोकियो आणि सॅन फ्रान्सिस्को ही अशी ठिकाणे आहेत, जिथे जगातील सर्वाधिक करोडपती लोक राहतात. ब्लूमबर्गने हेन्ली अँड पार्टनर्स ग्रुप या रेसिडेन्सी सल्लागार कंपनीचा हवाला देत अहवाल प्रकाशित केला आहे. सर्वाधिक करोडपती असलेल्या पहिल्या दहा शहरांपैकी पाच शहरे अमेरिकेतील आहेत.

या दहा शहरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

1. न्यूयॉर्क

2. टोकियो

3. सॅन फ्रान्सिस्को खाडी क्षेत्र

4. लंडन

5. सिंगापूर

6. लॉस एंजेलिस आणि मालिबू

7. शिकागो

8. ह्यूस्टन

9. बीजिंग

10.शांघाय

ब्लूमबर्गने जारी केलेल्या यादीनुसार, 2022 च्या पहिल्या भागात न्यूयॉर्क शहराने 12 टक्के करोडपती गमावले आहेत. तर सॅन फ्रान्सिस्कोमधील करोडपतींची संख्या चार टक्क्यांनी कमी झाली आहे. या काळातच लंडन (London) शहरातील करोडपतींच्या संख्येत नऊ टक्क्यांनी घट झाली आहे.

ब्लूमबर्गच्या या अहवालानुसार, रियाध आणि शारजाहमध्ये या वर्षी आतापर्यंत सर्वाधिक करोडपतींची नोंद झाली आहे. अबुधाबी आणि दुबईमध्ये (Dubai) करोडपतींची संख्या झपाट्याने वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.

दुसरीकडे, ब्लूमबर्ग अहवालाने असेही निदर्शनास आणले आहे की, बीजिंग (Beijing) आणि शांघायमधील करोडपतींच्या संख्येतही घट झाली आहे. कारण चीनमधूनच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT