Nawaz Sharif Lauds India's Economic Development Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: 'पंतप्रधानांना भिकेचा कटोरा घेऊन परदेशात जावे लागते' त्यांच्याच माजी पंतप्रधानांनी पाकिस्तानला फटकारले

त्यांनी भारताच्या आर्थिक विकासाचे कौतुक करताना म्हटले की, पाकिस्तान खोलवर कर्जात बुडाला आहे. आणि त्याची परतफेड करणे आता अशक्य आहे. देशाच्या पंतप्रधानांना भिकेचा कटोरा घेऊन पैसे मागण्यासाठी बीजिंग आणि अरब देशांच्या राजधानीत जावे लागते.

Ashutosh Masgaunde

Today the Prime Minister of Pakistan goes abroad begging for funds, while India has reached the moon says Nawaz Sharif:

लंडनला पळून गेलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्या देशाच्या आर्थिक स्थितीवर तीव्र शब्दांत टीका करत चांद्रयान-3 चंद्र च्या यशासह भारताच्या अर्थिक विकासाची उदाहरणे दिली.

शरीफ यांनी पाकिस्तानच्या आर्थिक संकटांसाठी लष्करी नेते आणि न्यायपालिकेच्या निर्णयांना जबाबदार धरले. गेल्या अनेक वर्षांपासून, पाकिस्तानची अर्थव्यवस्था घसरत गेली आहे, परिणामी गरीब लोकसंख्येला त्रास सहन करावा लागत आहे.

"आज पाकिस्तानचे पंतप्रधान देशोदेशी जाऊन निधीची भीक मागतात, तर भारत चंद्रावर पोहोचला आहे आणि G20 बैठका घेत आहे. भारताने जे पराक्रम केले ते पाकिस्तान का करू शकला नाही. याला जबाबदार कोण?" शरीफ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉलद्वारे लंडनहून लाहोरमध्ये पक्षाच्या बैठकीत भाषण केले.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे 73 वर्षीय नेते नवाझ शरीफ यांनी असेही नमूद केले की, त्यांच्या सरकारने 1990 मध्ये पाकिस्तानमध्ये सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांचा भारताने स्वीकार केला होता.

“जेव्हा अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्याकडे फक्त एक अब्ज डॉलर्सची गंगाजळी होती पण आता भारताचा परकीय चलन साठा 600 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला आहे. मग पाकिस्तान भीक मागायला का मागे राहिला,” असा सवाल त्यांनी केला.

शरीफ, ज्यांना अल अझिझिया मिल्स भ्रष्टाचार प्रकरणात सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये, त्यांना तत्कालीन लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी वैद्यकीय कारणास्तव देश सोडण्यास मदत केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Ashadhi Ekadashi 2025: टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर...आषाढी एकादशीला पंढरपुरात काय-काय करतात?

Goa Live News Updates: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना 12 कोटी 70 लाख रुपये मंजूर

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT