Tibet Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Tibet Earthquake: तिबेटमध्ये विनाशकारी भूकंप! 16 जणांचा मृत्यू, 340 हून अधिक घरे जमीनदोस्त; रुग्णालयांमध्ये जखमींची गर्दी VIDEO

Tibet Earthquake Death Toll 16 Dead 45 Injured: पठारी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिबेटमध्ये भूकंपाने हाहाकार उडवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7 इतकी नोंदवली गेली, ज्याचे हादरे अत्यंत भयानक होते.

Manish Jadhav

Tibet Earthquake Death Toll 16 Dead 45 Injured: पठारी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिबेटमध्ये भूकंपाने हाहाकार उडवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7 इतकी नोंदवली गेली, ज्याचे हादरे अत्यंत भयानक होते. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून, 45 पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले. मृतांची आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. या भूकंपाचा सर्वात मोठा फटका नागकू शहराला बसला असून, येथे 340 हून अधिक कच्ची-पक्की घरे पूर्णपणे ढासळली आहेत. त्यामुळे शेकडो कुटुंबीय उघड्यावर आले असून त्यांच्या डोक्यावरील निवारा हिरावला गेला.

या भीषण संकटानंतर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरु केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर विस्थापित नागरिकांसाठी तात्पुरते टेंट उभारण्यात आले. अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण नुसार, या भूकंपाचा (Earthquake) केंद्रबिंदू तिबेटची राजधानी ल्हासापासून जवळपास 191 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागकू शहराच्या बाकेन काउंटीमध्ये, जमिनीखाली 18 किलोमीटर खोलीवर होता. स्थानिक वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास हा भूकंप झाल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

गेल्या पाच वर्षांत तिबेटमध्ये आलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे सांगितले जात आहे. नागकू व्यतिरिक्त बाकेन, कमदो आणि न्यिंगची या शहरांमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या अपघातानंतर अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला, तर डोंगराळ भागातून दरडी कोसळल्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली. परिणामी, बचाव पथकांना दुर्गम भागात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, तरीही प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करत मदतकार्य चालू ठेवले.

तिबेटच्या या भूप्रदेशात वारंवार होणाऱ्या या संहारामागे मोठी वैज्ञानिक कारणे आहेत. तिबेट हा प्रदेश भारतीय आणि यूरेशियाई टेक्टोनिक प्लेट्सच्या अत्यंत संवेदनशील भूभागावर वसलेला आहे. साधारण 50 दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय प्लेट उत्तर दिशेला सरकली आणि ती यूरेशियाई प्लेट्ससोबत धडकली. आजही या दोन्ही प्लेट्सची एकमेकांसोबत टक्कर सुरुच असून, दरवर्षी 50 ते 65 मिलीमीटर वेगाने भारतीय प्लेट यूरेशियाई प्लेट्सच्या खाली सरकत आहे.

या प्रचंड घर्षणामुळे जमिनीच्या पोटात अफाट ताण निर्माण होतो आणि ऊर्जा बाहेर पडल्यामुळे भूकंपाच्या विनाशकारी लाटा निर्माण होतात. यापूर्वीही या प्रदेशात आणि शेजारील भागात मोठे भूकंप आले आहेत, परंतु या ताज्या आपत्तीमुळे तिबेटमधील जनजीवन विस्कळीत झाले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Real Estate Dispute: कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर सहन करणार नाही! हायकोर्टाचा प्रकाश अग्रवाल यांना मोठा दणका; ठोठावला 'इतक्या' हजारांचा दंड

Codli Mine Block: कोडली खाण सुरू करण्याचे स्थानिकांकडून स्वागत; 'रोजगार द्या, पर्यावरणही जपा!'

Land Conservation: गोव्यात आणखी 12.96 लाख चौरस मीटर जमीन 'नो-डेव्हलपमेंट झोन'मध्ये; सात तालुक्यांचा समावेश

IND vs NZ: ईशान किशन दुखापतीमुळे दुसऱ्या टी-20 मधून बाहेर; वैभव सूर्यवंशीला मिळणार संधी, न्यूझीलंडविरुद्ध 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Goa Politics: 'पोलिसांनी आधी सत्य शोधावे'; हरमल पंचक्रोशीच्या तक्रारीवरून पार्सेकर-आरोलकर आमनेसामने

SCROLL FOR NEXT