Ukrainian Dainik Gomantak
ग्लोबल

'युक्रेनमधून एका आठवड्यात दहा लाखांहून अधिक लोकांनी केले पलायन'

रशिया (Russia) युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. राजधानी कीव आणि खार्किवशिवाय रशियन क्षेपणास्त्रे युक्रेनमधील अनेक शहरांना लक्ष्य करत आहेत.

दैनिक गोमन्तक

रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. राजधानी कीव आणि खार्किवशिवाय रशियन क्षेपणास्त्रे युक्रेनमधील अनेक शहरांना लक्ष्य करत आहेत. या हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील (Ukraine) अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रशियन हल्ल्यांमुळे लाखो युक्रेनियन लोकांनी आपल्या देशातून पलायन केल्याचा दावा संयुक्त राष्ट्र निर्वासित संस्थेकडून (UNHCR) करण्यात आला आहे. The UNHCR claims that more than a million people have fled Ukraine in a single week

दरम्यान, यूएनने गुरुवारी सांगितले की, गेल्या आठवड्यात दहा लाखांहून अधिक निर्वासितांनी देश सोडून पलायन केले आहे. यूएनएचसीआरचे उच्चायुक्त फिलिपो ग्रँडी (Filippo Grandi) यांनी ट्विट करत म्हटले की, 'अवघ्या सात दिवसांत दहा लाखांहून अधिक लोकांनी युक्रेनमधून शेजारच्या देशांमध्ये पलायन केले आहे. युक्रेनमध्ये (Ukraine) लाखो लोकांना मानवतावादी मदत देण्यात येत आहे.'

रोमानियामध्ये 139,000 लोकांनी आश्रय घेतला

युक्रेनच्या 1 लाख 39 हजार लोकांनी रोमानियामध्ये आश्रय घेतला आहे. यासंबंधीची आकडेवारी रोमानियाकडून (Romania) देण्यात आली आहे. रशियन हल्ल्यानंतर 1 लाख 39 हजार अधिक लोक पलायन करुन रोमानियामध्ये आले आहेत. निर्वासितांनी युक्रेनच्या चार सीमा चेक पॉईंट्सद्वारे रोमानियामध्ये प्रवेश केला आहे.

तसेच, रशिया (Russia) आणि युक्रेन यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी आज बेलारुसच्या सीमेवर होणार आहे. युक्रेनचे एक शिष्टमंडळ चर्चेसाठी रवाना झाले आहे, परंतु रशियाचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी अल्टिमेटम स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. 24 मार्च रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Quepem: '..अंधाराची खंत तू कशाला करिसी रे'! अंथरुणाला खिळलेल्या 75 वर्षाच्या व्यक्तीचे घर कोसळले, श्रमधाममधून 15 दिवसात पुनर्बांधणी

Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

SCROLL FOR NEXT