Afghanistan School Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबान्यांचा पहिला फतवा जारी, मुला- मुलींना एकत्र शिक्षण घेता येणार नाही

अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील (Herat Province) तालिबान अधिकाऱ्यांनी सरकारी आणि खाजगी विद्यापीठांना आदेश दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) राजकिय सत्ता स्थापनेस सुरुवात करताच पहिला फतवा तालिबानने जारी केला आहे. खामा न्यूजने असे वृत्त दिले आहे की, अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील (Herat Province) तालिबान अधिकाऱ्यांनी सरकारी आणि खाजगी विद्यापीठांना आदेश दिले आहेत की, मुलींना यापुढे मुलांसोबत एकाच वर्गात बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. विद्यापीठाचे व्याख्याते, खाजगी संस्थांचे मालक आणि तालिबानी अधिकारी यांच्यात तीन तास चाललेल्या बैठकीत असे म्हटले गेले की, सह-शिक्षण चालू ठेवणे हा पर्याय नाही तो रद्द केला पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये सह-शिक्षण आणि विभक्तपणाची एक मिश्र प्रणाली आहे, ज्यामध्ये शाळा स्वतंत्र वर्ग आयोजित करतात, तर सह-शिक्षण देशभरातील सरकारी आणि खाजगी विद्यापीठे आणि संस्थांमध्ये लागू केले जाते.

हेरात प्रांतातील व्याख्यातांनी असा युक्तिवाद केला आहे की, सरकारी विद्यापीठे आणि संस्था स्वतंत्रपणे वर्ग चालवू शकतात, परंतु खाजगी संस्था महिला विद्यार्थ्यांच्या मर्यादित संख्येमुळे स्वतंत्र वर्ग देऊ शकत नाहीत. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीच्या उच्च शिक्षणाचे प्रमुख मुल्ला फरीद, जे हेरात येथील बैठकीत तालिबानचे प्रतिनिधित्व करत होते. ते म्हणाले की, समाजातील सर्व वाईट गोष्टींचे मूळ सह-शिक्षण असल्याने रद्द केले पाहिजे.

फरीदने पर्याय म्हणून सुचवले की महिला व्याख्याते किंवा वृद्ध पुरुषांना महिला विद्यार्थ्यांना शिकवण्याची परवानगी आहे मात्र सहशिक्षणाला पर्याय नाही. हेरातमधील व्याख्याते म्हणाले की, खासगी संस्थांना स्वतंत्र वर्ग परवडत नसल्याने हजारो मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू शकतात. प्रांतात खाजगी आणि सरकारी विद्यापीठे आणि संस्थांमध्ये सुमारे 40,000 विद्यार्थी आणि 2,000 व्याख्याते आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT