तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद (Taliban spokesman Jabihullah Mujahid) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.  Dainik gomantak
ग्लोबल

Talibanयापुढे परदेशी सैन्याच्या माघारीला होणारा विलंब सहन करणार नाही

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद (Taliban spokesman Jabihullah Mujahid) यांचा इशारा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत परदेशी सैन्याच्या माघारीसाठी ऑगस्टच्या पुढे मुदत देण्यात येणार नाही.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानातून (Afghanistan) अमेरिकन सैन्य (American military) मागे घेण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना आता अशी भीती व्यक्त केली जात आहे की सप्टेंबर किंवा त्यानंतर अमेरिकेसह इतर देश आपले सैन्य अफगाणिस्तानातून संपूर्ण पणे माघार (Withdrawal) घेऊ शकतात. ब्रिटनने याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. ब्रिटनचे म्हणणे आहे की, तालिबानने आंतरराष्ट्रीय जगाला आश्वासन दिले पाहिजे की ते ऑगस्टनंतर सैन्य मागे घेण्यास अडथळा आणणार नाही. दुसरीकडे, तालिबानने (Taliban) अगदी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीत परदेशी सैन्याच्या माघारीसाठी ऑगस्टच्या पुढे मुदत देण्यात येणार नाही.

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद (Taliban spokesman Jabihullah Mujahid) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. तालिबान यापुढे परदेशी सैन्याच्या माघारीला होणारा विलंब सहन करणार नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या दिलेल्या मर्यादेवर परत जावे लागेल, अन्यथा त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल. मुजाहिद यांनी असेही म्हटले आहे, अमेरिकेने आपल्या नागरिकांना निर्धारित वेळेत येथून निघून जावे.

गेल्या वर्षी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत तालिबान आणि अमेरिकेमध्ये करार झाला होता. या अंतर्गत, अमेरिका 31 मे 2021 पर्यंत आपल्या सर्व सैन्यासह येथून परतणार होती. जानेवारीमध्ये सत्ता अमेरिकेत सत्तांतर होऊन जो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली. त्यावेळीही तालिबानने त्यावर आक्षेप घेतला होता. पण आता तालिबान आणखीन मुदत वाढवून देणार नाही. असे तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी कडक शब्दात सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT