Taliban

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

पाकिस्तानला तालिबानचे टेन्शन, बॉर्डरवरील हटवले काटेरी कुंपण

अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतातील गुश्ता जिल्ह्यात ड्युरंड रेषेवर पाकिस्तानी सैन्याने लावलेल्या काटेरी तारा तालिबानने (Taliban) हटवले आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानातील (Afghanistan) नांगरहार प्रांतातील गुश्ता जिल्ह्यात ड्युरंड रेषेवर पाकिस्तानी सैन्याने लावलेल्या काटेरी तारा तालिबानने (Taliban) हटवले आहे. याबाबतची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. खामा प्रेसच्या म्हणण्यानुसार, सीमारेषा उभारुन रुंदीकरण केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने बसवलेल्या काटेरी तारा उद्ध्वस्त करुन सर्व माल अफगाणिस्तानात आणण्यात आला.

जनरल डायरेक्टरेट ऑफ इंटेलिजन्स (GDI) चे प्रांतीय प्रमुख डॉ. बशीर गुश्ता या सीमावर्ती जिल्ह्यात ऑपरेशनचे नेतृत्व करत होते. इतर माहितीच्या संदर्भात खामा प्रेसने सांगितले की, या घटनेनंतर पाकिस्तानी सैन्याने सोमवारी रात्री कुनार प्रांतात गोळीबार केला. पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) दरम्यान सुमारे 2,400 किमीची असलेल्या ड्युरंड रेषेवर पाकिस्तानने काटेरी तारांचे काम जवळपास पूर्ण केल्याचे वृत्त आहे.

सुमारे महिनाभरापूर्वी तालिबानकडून पाकिस्तानला ड्युरंड रेषेबाबत धमकी देण्यात आली होती. पाकिस्तानने सीमेवर कुंपण घालण्यास नकार दिल्यास अफगाण नागरिकांना ड्युरंड रेषा ओलांडण्यास बंदी घालण्यात येईल, असे म्हटले आहे. सिंगापूर पोस्टनुसार, पाकिस्तान ड्युरंड रेषेचा हवाला देत तालिबानला ब्लॅकमेल करत आहे. त्याच वेळी, तालिबान सरकारने हे स्पष्ट केले आहे की, ड्युरंड रेषेवर अशा अटींना परवानगी नाही. ड्युरंड लाइन अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील पारंपारिक पश्तूनांना विभाजित करते. अफगाणिस्तानचा नवा शासक बनलेल्या तालिबानने (Taliban) पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. ड्युरंड रेषेवरील तारबंदीला त्यांनी विरोध केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT