Nepal Dainik Gomantak
ग्लोबल

भारताशेजारील आग्नेय प्रांताचं नेपाळनं केलं नामकरण

भारताला (India) लागून असलेल्या नेपाळच्या आग्नेय प्रांताला मधेस प्रदेश असे नाव देण्यात आले आहे. जनकपूर ही या प्रदेशाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

भारताला लागून असलेल्या नेपाळच्या आग्नेय प्रांताला मधेस प्रदेश असे नाव देण्यात आले आहे. जनकपूर ही या प्रदेशाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली आहे. 2015 मध्ये प्रांताची निर्मिती झाल्यानंतर प्रदेशाच्या अधिकृत नावावर दीर्घकाळ चाललेला वाद मिटला आहे. प्रांतातील बहुतांश लोकसंख्या भारतीय वंशाची असून बहुतांश लोक मैथिली भाषिक आहेत.

दरम्यान, सोमवारी प्रांतीय विधानसभेने दोन तृतीयांश बहुमताने दोन्ही निर्णयांवर मतदान केले. 99 सदस्यांपैकी 78 सदस्यांनी जनकपूरला राजधानी आणि 80 जणांनी प्रांताचे नाव मधेस ठेवण्याच्या बाजूने मतदान केले. मधेस हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने नेपाळमधील (Nepal) सर्वात लहान राज्य असून लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. दक्षिणेला त्याची सीमा बिहारशी (Bihar) आहे. त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. स्थानिक भाषेत मधेशी म्हणजे मैदानी भागातील लोक. मधेसचा भगवान शिवाशी संबंध हिंदू धर्मग्रंथात सांगण्यात आला आहे.

मधेशींनी विरोध केला होता

सप्टेंबर 2015 मध्ये नेपाळचे नवीन संविधान लागू झाल्यानंतर हा प्रदेश प्रांत बनला. सप्टेंबर 2015 ते फेब्रुवारी 2016 दरम्यान, नेपाळच्या संविधानात अधिक अधिकार आणि प्रतिनिधित्वाच्या मागणीसाठी मधेसींनी केलेल्या निदर्शनांमध्ये 50 लोक मारले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

Sindhudurg Crime News: अंगावर जखमांच्या खुणा, अर्धनग्न अवस्था अन् गोधडीत गुंडाळलेला मृतदेह; तिलारी कालव्यात सापडलेल्या मृतदेहाने खळबळ, घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT