Island  Dainik Gomantak
ग्लोबल

या देशात पुन्हा उघडले 'सेक्स आयलंड', जाणून घ्या का आहे हे ठिकाण वादग्रस्त

अमेरिकेतील (America) लास वेगासमध्ये एक ठिकाण आहे, जे पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेतील लास वेगासमध्ये एक ठिकाण आहे, जे पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. या ठिकाणाची खास गोष्ट म्हणजे हे 'सेक्स आयलंड' म्हणून ओळखले जाते. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे या बेटावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र ते आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हे ठिकाण यापूर्वी अनेक वादांमुळे चर्चेत राहिले आहे. (The resort called Sex Island has been reopened in Las Vegas USA)

वास्तविक, अमेरिकेच्या (America) लास वेगासमध्ये 'सेक्स आयलंड' नावाने ओळखले जाणारे रिसॉर्ट उघडले आहे. डेली स्टारच्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, या रिसॉर्टने जाहिरातीद्वारे आपले उद्घाटन घोषित केले आहे. कधी आणि कोणासाठी उघडले जात आहे, असेही या जाहिरातीत सांगण्यात आले आहे. यासोबतच त्याची किंमत काय असेल हेही नमूद करण्यात आले आहे.

अहवालात जाहिरातीचा हवाला देऊन म्हटले आहे की, ''यावेळी हे ठिकाण 5 मे ते 8 मे या कालावधीत उघडले जाईल आणि या दरम्यान एकूण 50 पाहुण्यांना 50 तिकिटे दिली जातील. इथे किंमतीबद्दलही सांगण्यात आले आहे की, प्रत्येक तिकिटाची किंमत $ 4500 म्हणजेच सुमारे 3.5 लाख रुपये असेल. विशेष म्हणजे बिटकॉइनमध्ये (Bitcoin) देखील हे पेमेंट केले जाऊ शकते. नोंदणीनंतर, रिसॉर्ट स्वतः लोकांना थेट खाजगी ठिकाणी घेऊन जाईल.''

खरं तर, हे रिसॉर्ट भ्रष्टतेसाठी पूर्णपणे प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ते अनेकदा विवादातही अडकले आहे. इथे लोकांना अमर्यादित सेक्ससोबत दारु आणि गांजा दिला जातो. इथे येणारे लोक तीन रात्री चार दिवस वेळ घालवू शकतात. इथे त्यांच्यासोबत दोन मुली असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT