Muslim Person Dainik Gomantak
ग्लोबल

Railway स्टेशनवर नमाजाला विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्याला मिळाली शिक्षा, नोकरी...!

Canada News: रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती नमाज अदा करत होता. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या मुस्लिम व्यक्तीला नमाज अदा करण्यापासून रोखले.

Manish Jadhav

Canada News: रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती नमाज अदा करत होता. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्याने त्या मुस्लिम व्यक्तीला नमाज अदा करण्यापासून रोखले. नंतर या सुरक्षा रक्षकाला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. हे प्रकरण कॅनडाचे आहे.

रेल्वे स्टेशनवर ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली त्याचे नाव अहमद असल्याचे सांगण्यात येत आहे. अहमदने ओटावाच्या सीटीव्ही न्यूजला सांगितले की, सुरक्षा रक्षक त्याच्याकडे आला आणि त्याला येथे नमाज अदा करु नका असे सांगितले.

सुरक्षा रक्षक कॅनडाच्या व्हाया रेलमध्ये काम करतो. अहमदची प्रार्थना आधीच पूर्ण झाली होती, जेव्हा त्याला असे करण्यापासून रोखले गेले.

सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत

सोशल मीडियावर (Social Media) या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये, सुरक्षा रक्षक इथे नमाज अदा करु नका असे म्हणताना ऐकू येत आहे.

तो पुढे अहमदला म्हणाला की, 'तुम्ही लोकांनी इथे नमाज अदा करावी अशी आमची इच्छा नाही. तुमच्यामुळे बाकीच्या प्रवाशांना त्रास होत आहे.' ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती. मात्र, अहमद यांनी गुरुवारी याबाबत माध्यमांशी संवाद साधला.

तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओही बनवला. काही वेळाने हा व्हिडिओ व्हायरल झाला. तो व्हायरल होताच सोशल मीडियावर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

घटनेच्या चौकशीची मागणी

या घटनेवर वाया रेल आणि नॅशनल कौन्सिल ऑफ कॅनेडियन मुस्लिम यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. निवेदनानुसार, ही घटना अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे.

या घटनेची योग्य चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. या घटनेनंतर ओटावा स्टेशनवर नमाज अदा करण्यापासून रोखलेल्या अहमदशी चर्चा सुरु असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अहमद म्हणाले की, या घटनेने मला खूप लाज वाटली. त्याचवेळी, कॅनडाची (Canada) राजधानी ओटावा येथे हे सर्व घडत आहे यावर माझा विश्वास बसत नाही.

दुसरीकडे, या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल, असे व्हाया रेलचे म्हणणे आहे. यासोबतच त्यांनी मुस्लिम (Muslim) समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करण्याबाबतही सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT