Taliban Supreme Leader Haibatullah Akhundzada Dainik Gomantak
ग्लोबल

...अन् मृत्यूच्या विळख्यातून तालिबानी प्रमुख आला जगासमोर

तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतुल्ला अखुंदजादा (Haibatullah Akhundzada) पहिल्यांदाच सार्वजनिकपणे जगासमोर आला आहे.

दैनिक गोमन्तक

तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतुल्ला अखुंदजादा (Haibatullah Akhundzada) पहिल्यांदाच सार्वजनिकपणे जगासमोर आला आहे. अखुंदजादा (Taliban Supreme Leader Haibatullah Akhundzada) यांनी दक्षिण अफगाणिस्तानच्या कंदाहार (Kandahar) शहरात समर्थकांना संबोधित केले. या संबंधीची माहिती रविवारी अधिकाऱ्यांनी दिली. अखुंदजादा हा 2016 पासून तालिबानच्या इस्लामी चळवळीचा आध्यात्मिक प्रमुख आहे. तो जगापासूनही दूर होता. ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवला तेव्हाही तो जगासमोर आला नव्हता.

हैबतुल्ला अखुंदजादा हा आतापर्यंत लो प्रोफाइल राहीलेला आहे. त्यामुळे तालिबान सरकारमधील त्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अखुंदजादा यांच्या मृत्यूच्या अफवाही मागील काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. तालिबान अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अखुंदजादा शनिवारी दारुल उलूम हकीमा मदरसामध्ये (Darul Uloom Hakimah madrassa) "त्याच्या शूर सैनिक आणि शिष्यांशी बोलण्यासाठी" पोहोचला. कार्यक्रमादरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. दरम्यान कार्यक्रमाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ समोर आले नाहीत. परंतु दहा मिनिटांचे ऑडिओ रेकॉर्डिंग तालिबानच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करण्यात आले.

काय म्हणाले अखुंदजादा ऑडिओमध्ये?

अखुंदजादाला 'अमिरुल मोमिनीन' किंवा निष्ठावंतांचा सेनापती म्हणतात. ऑडिओमध्ये तालिबानचा सर्वोच्च नेता धार्मिक संदेश देताना दिसला. या मेसेजमध्ये राजकारणाबाबत कोणतीही चर्चा नव्हती. तालिबानी नेतृत्वासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. तालिबानमधील 'शहीद' आणि जखमी झालेल्या सैनिकांसाठी त्यांनी प्रार्थना केली. यासोबतच या मोठ्या परीक्षेत इस्लामिक अमिरातच्या अधिकाऱ्यांच्या यशासाठी प्रार्थनाही करण्यात आली. 2016 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तालिबानचा माजी प्रमुख मुल्ला अख्तर मन्सूर मारला गेल्यानंतर अखुंदजादा यांची ताबडतोब तालिबानचा नेता (Taliban leadership) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्याची प्रतीक्षा

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूल (Kabul) ताब्यात घेतली. आणि पाश्चात्य समर्थित अफगाण सरकार कोसळले. अफगाणिस्तानचा पूर्ण ताबा घेण्यापूर्वीच तालिबानने देशातील ग्रामीण भाग काबीज करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी, 30 ऑगस्ट रोजी अमेरिकन सुरक्षा दलांनी माघार घेतल्यानंतर तालिबानने नवीन अंतरिम सरकारची घोषणा केली. मात्र, या सरकारमध्ये अल्पसंख्याक समाज आणि महिलांचा सहभाग नाही. यामुळे सरकारला अद्याप आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही. तालिबानला सर्वसमावेशक सरकारचे वचन पूर्ण करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT