Taslima Nasreen Dainik Gomantak
ग्लोबल

धर्मांधतेची आग केवळ हिंदूंनाच नाही तर बांगलादेशला भस्मसात करेल: तस्लिमा नसरीन

बांगलादेशचे तालिबान (Taliban) व्हायला वेळ लागणार नाही, हे सांगायला मला अजिबात संकोच वाटत नाही.

दैनिक गोमन्तक

बांगलादेशात (Bangladesh) हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले करुन आणि त्यांची घरे जाळून जे वातावरण निर्माण केले जात आहे. ते केवळ हिंदू किंवा गैर-मुस्लिम समाजातच भीतीचे वातावरण निर्माण करत नाही, तर देशातील महिलांमध्येही घबराटीचं वातावरण निर्माण करत आहेत. (Hindu-Muslim) हळूहळू धर्मांधतेची ही आग त्यांना भस्मसात करेल... आणि त्याची सुरुवात झाली आहे. हे थांबवले नाही तर बांगलादेशचे तालिबान (Taliban) व्हायला वेळ लागणार नाही, हे सांगायला मला अजिबात संकोच वाटत नाही. बांगलादेशातील महिलांवरील अत्याचार जगासमोर आणणाऱ्या लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) या संपूर्ण घटनेला बांगलादेशसाठी दुर्दैवी मानतात. या कट्टरतेमुळे त्या 27 वर्षांपासून बांगलादेशातून निर्वासित जीवन जगत आहे.

दरम्यान, बंगाली भाषा आणि संस्कृती वाचवण्यासाठी बांगलादेशचा जन्म झाला, असल्याचं त्या सांगतात. ते उद्दिष्ट मागे पडल्याचे दिसत आहे. या घटनांना बांगलादेशातील सर्व सरकारे कोणत्या ना कोणत्या प्रकारे जबाबदार आहेत. कारण प्रत्येक सरकारने धर्माला शस्त्र बनवून सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग निवडला. सरकारच्या या मजबुरीचा फायदा कट्टरपंथी शक्ती घेत आहेत. हेच कारण आहे की, जेव्हा बांगलादेशच्या विकासासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांची आवश्यकता आहे, मात्र मोठ्या प्रमाणात मदरसे उघडले जात आहेत. जिहादच्या नावाखाली तरुण पिढीला धर्मांधतेकडे ढकलले जात आहे. आणि त्याचा परिणाम दिसू लागला आहे. ढाका विद्यालय संभवत: जगातील एकमेव विद्यापीठ असेल, जिथून देशाची संस्कृती आणि अस्तित्वाची लढाई झाली. आज महिला तिथे हिजाबमध्ये दिसतात. हिजाब घालणे चुकीचे नाही, पण जबरदस्ती करणे चुकीचे आहे. सध्या हिंदू समाजावर हल्ले होत आहेत आणि हळूहळू त्याचा परिणाम तेथील महिलांवर (Hindu-Muslim) होऊ लागला आहे. हे आता थांबवले नाही तर इतर कट्टरवादी देशांप्रमाणे बांगलादेशातील महिलाही पुन्हा काळाच्या पडद्यामागे ढकलल्या जातील.

आपल्या देशाची प्रतिमा मलिन होत आहे

बांगलादेशात अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या घटना चिंता वाढवत आहेत. छोट्या छोट्या घटनांना मोठे वळण लागले आहे. मात्र बांगलादेशातील मोठा पुरोगामी मुस्लिम वर्ग याच्या विरोधात आहे. तसेच ते सातत्याने निषेध करत आहेत. ते त्याविरोधात आवाजही उठवत असल्याचे बांगलादेशच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य आणि इंडो-बांगला मैत्री समितीचे अध्यक्ष बॅरिस्टर अमीर-उल-इस्लाम यांनी म्हटले. विशेष म्हणजे त्यांनी बांगलादेश स्वातंत्र्याच्या घोषणेचा (1971) मसुदाही तयार केला आहे. व्यवसायाने वकील असलेले अमीर-उल-इस्लाम यांचे मते, काही कट्टरपंथी शक्ती बांगलादेशात सरकार कमकुवत करण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण करत आहेत. मुक्तिसंग्रामानंतर बांगलादेशची राज्यघटना तयार झाली तेव्हा आपण धर्मनिरपेक्षता स्वीकारली.

तसेच, आपली राज्यघटना मोठ्या प्रमाणात भारतीय राज्यघटनेपासून प्रेरित आहे. बांगलादेशचे संविधान या देशातील प्रत्येक नागरिकाला (मुस्लिम, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन किंवा इतर कोणत्याही धर्माचे अनुयायी) समान अधिकार देते. त्यांचे घटनात्मक अधिकार आणि कर्तव्ये समान आहेत. धर्म किंवा जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव करता येणार नाही. बांगलादेशच्या राज्यघटनेत शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. यामुळेच या देशातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही धर्माची किंवा जातीची व्यक्ती प्रवेशासाठी पात्र आहे. त्याला धर्माच्या आधारे रोखता येणार नाही. हे स्वातंत्र्य फार कमी देशांमध्ये आहे. या घटनांचा केवळ हिंदूंवरच परिणाम होत नाही, तर बांगलादेशची प्रतिमाही मलीन होत आहे. अविभाजित किंवा विभाजित, बांगलादेशच्या मातीत धर्मापेक्षा साहित्य, संस्कृती आणि पुरोगामी विचाराला जास्त स्थान आहे.

परकीय शक्तींचे षड्यंत्र

बांगलादेशमध्ये सध्या ज्या घटना घडत आहेत त्या भारत-बांगलादेश संबंध कमकुवत करण्यासाठी केल्या जात आहेत. पाकिस्तान आणि इतर परकीय शक्ती कट्टरतावादी विचारसरणीला प्रोत्साहन देऊन नव्या पिढीची दिशाभूल करण्याचा केला जात आहे. हळूहळू या घटना बांगलादेशचा डीएनए बदलतील, असं नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित शिक्षक काझी मासूम अख्तर (Qazi Masoom Akhtar) यांनी म्हटले आहे. बंगालची राजधानी कोलकाता येथे 99.99 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या मटिया बुर्जच्या सरकारी मदरशात त्यांनी जन-गण-मन वाचनाची अंमलबजावणी केली तेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात आले. मुलींसाठी व्यावसायिक गाणे, संगीत, नाटकाचे स्टेजिंग सुरु झाले. बालविवाह थांबला. दोन वर्षांत मदरशाचा पुनरुज्जीवन झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT