Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

चीनी कम्युनिस्ट पक्ष होणार शंभर वर्षाचा; काय बोलणार शी जिनपिंग

जगात कोरोनाचा (Covid 19) प्रसार केल्याचा आरोप झालेल्या आणि अनेक जागतिक निर्बंधाचा सामना केलेल्या चीनमधील (China) सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (Communist Party of China) उद्या 1 जून रोजी शंभरी पार करणार आहे.

दैनिक गोमन्तक

जगात कोरोनाचा (Covid 19) प्रसार केल्याचा आरोप झालेल्या आणि अनेक जागतिक निर्बंधाचा सामना केलेल्या चीनमधील (China) सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (Communist Party of China) उद्या 1 जून रोजी शंभरी पार करणार आहे. जागतिक पटालावर चीनचंच नव्हे तर कम्युनिस्ट विचारसरणीचं प्रस्थ निर्माण करणारा कम्युनिस्ट पक्ष हा शंभर वर्षाचा होणार आहे. कम्युनिस्ट विचारसरणीनुसार चालणारे प्रमुख देश म्हणून अशी ख्याती असणारा पक्ष असल्यामुळे आणि चीनमध्ये मागील अनेक वर्षापासून सत्तेत असल्यामुळे या पक्षाच्या शंभरी पूर्ण करण्याला महत्त्व आहेच. परंतु त्याचवेळी सध्याच्या परिस्थीमध्ये कोरोनामुळे जागतिक पातळीवर चीनची मोठी मानहानी झाली आहे. उद्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या भाषणाकडे चीनी नागरिकांबरोबर जगाचं लक्ष असणार आहे.

शी जिनपिंग जागतिक पटलावर काय संदेश देणार?

चीनमध्ये एरवी कम्युनिस्ट पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला असता. मात्र सध्याच्या कोरोनाची परिस्थीतीत या दिवशी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होणार नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंनपिंग यांचं अभिभाषण होणार असून त्यामधून जागतिक पटलावर चीन इतर महासत्तांना तसेच शेजारी असणाऱ्या देशांनाही इशारा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना विषाणूची निर्मिती चीनमध्ये झाली की चीननेच कोरोनाला प्रयोगशाळांमध्ये जन्माला घातल याविषयी अजूनही निश्चित असं उत्तर मिळालेले नसलं, तरी या मुद्यावरुन जागतिक पटलावर चीनविषयी मोठ्याप्रमाणावर असंतोष व्यक्त केला जात असल्यामुळे उद्याच्या शी जिनपिंग यांच्या भाषणाकडे चीनी नागरिकांबरोबर जगाला काय संदेश देणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

चीनचं रशियाशी वौर आणि मैत्री

चायनिझ कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1921मध्ये झाली होती. चीनमध्ये रशियाच्या सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाच्या (Communist Party) सहकार्याने या पक्षाची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळामध्ये रशियामधील कम्युनिस्ट पक्ष आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षामध्ये मैत्री आणि सहकार्याचे संबंध होते. मात्र पुढील काळामध्ये दोन्ही देशांच्या विचारसणीमुळे दुरावा येत गेला आणि आंतरराष्ट्रीय समाजवादी चळवळींवर सीपीसीचा वरचष्मा राहीला. चीन आणि रशिया यांच्यातल्या दुराव्याचे परिणाम शेजारी असणाऱ्या भारतावर होताना दिसून आला. म्हणूनच मार्क्सवाद मानणाऱ्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. तसेच माओवादी विचार मानणारा दुसरा गट हा नक्षलवादी चळवळींकडे आकर्षित झाला.

सीपीसी वाढती अंतर्गत धुसफूस?

दरम्यान, सीपीसी शंभरी पार करत असताना दुसरीकडे पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचे देखील बोललं जात आहे. सध्या पक्षाचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांनी 5 वर्षांच्या दोन टर्म पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षांच्या राजकीय निवृत्तीबाबत घटनादुरुस्ती करुन कलम काढण्यात आले. त्यामुळे आता शी जिंनपिंग हे अनिश्चित काळासाठी अध्यक्ष राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT