अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. Dainik Gomantak
ग्लोबल

American Soldiersने सांगितली 'त्या' लाहनग्या अफगाण मुलाची कहाणी

काबुलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमा भिंतीमध्ये एका अफगाण मुलाचा व्हिडिओ (Video of Afghan boy) सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

Afghanistan Crisis: तालिबान्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर (After the Taliban took power) अफगाणिस्तानची (Afghanistan) परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर (Serious) होऊ लागली आहे. तालिबानच्या भीतीमुळे लोकांना देश सोडावा लागत आहे. राजधानी काबूलच्या विमानतळावर हजारो लोक जमा होत आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालिबानी दहशतवादी हवेत अंदाधुंद गोळीबार करून त्यांना नियंत्रित करत आहेत. दरम्यान, काबुलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमा भिंतीमध्ये एका अफगाण मुलाचा व्हिडिओ (Video of Afghan boy) सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मूल त्याच्या वडिलांनी एका अमेरिकन सैनिकाला (American soldiers) सोपवताना दिसत आहे. मुलाला दिल्यानंतर अमेरिकन सैनिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

जॉन किर्बीने सांगितले, त्याच्या पालकांनी अमेरिकन सैनिकांना मुलाची काळजी घेण्यास सांगितले कारण मूल खूप आजारी होते. मूल अमेरिकन सैनिकांकडे देताच त्याला विमानतळाजवळील नॉर्वेजियन रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्या मुलावर उपचार करण्यात आले आहेत. त्यानंतर या मुलाला त्याच्या वडिलांकडे परत करण्यात आले आहे. किर्बी म्हणाले, हे याचेच उदाहरण आहे की अमेरिकन सैनिकांना तेथील परिस्थितीची जाणीव असून, ते दयाळूपणे आपले कर्तव्य बजावत आहे.

ते म्हणाले, मूल आता कुठे आहे याची माहिती आम्हाला नाही, कारण उपचारानंतर त्याला त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडी नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) काबूल विमानतळवर आपला कब्जा कायम ठेवू इच्छित आहे. सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्हर्च्युअल बैठकीत हा निर्णय घेतला आहे. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर नाटो देशांतील 18 हजारहून अधिक नागरिकांना तेथून बाहेर काढण्यात आले आहे. यापेक्षा कित्येक पटीने जास्त परदेशी नागरिक अजूनही काबूल आणि मोठ्या शहरांमध्ये आहेत.

उल्लेखनीयबाब म्हणजे, अफगाणिस्तानचा 95 टक्के प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने देशाच्या सीमेवरून हालचालींवर बंदी घातली आहे. त्यामुळे काबूल विमानतळ हा देशाबाहेर जाण्याचा एकमेव मार्ग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT