Rangina Kargar Dainik Gomantak
ग्लोबल

महात्मा गांधींच्या देशाकडून अशी आपेक्षा नव्हती, अफगाण खासदाराचं वक्तव्य

दैनिक गोमन्तक

तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर अनेक अफगाण नागरिक (Afghan Citizen) आपला जीव वाचविण्यासाठी इतर देशांमध्ये आश्रय घेऊ लागले. यातच भारतामध्ये अनेक अफगाण नागरिकांसह अफगाण खासदार शरण घेऊ लागले आहेत. यातच आता अफगाणिस्तान संसदेच्या एका महिला सदस्याने म्हटले की, तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर पाच दिवसांनी अर्थात 20 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर आल्यानंतर मला हद्दपार करण्यात आले. त्या फरिआब प्रांताचे (Fariab Province) प्रतिनिधीत्व करतात. या हद्दपार करण्यात आलेल्या महिला खासदाराचं नाव रंगीना कारगर (Rangina Kargar) अस आहे. त्यांनी पुढे म्हटले की, 20 ऑगस्ट रोजी इस्तंबूलहून दुबईला जाणारे विमान नवी दिल्लीला पोहोचले. माझ्याकडे एक डिप्लोमेटिक/अधिकृत पासपोर्ट आहे, जो भारतासह अनेक देशांमध्ये पारस्परिक व्यवस्थेतंर्गत व्हिसा मुक्त प्रवासाची सुविधा देतो.

माध्यमाच्या अहवालानुसार, कारगर 2010 पासून अफगाणिस्तानच्या खासदार आहेत. कारगर यांनी म्हटले की, या अधिकृत पासपोर्टवर अनेक वेळा मी भारत प्रवास केला होता. पूर्वी मला एन्ट्री मिळत असे, तसेच स्वागतही करण्यात येत असत. मात्र यावेळी मात्र मला एअरपोर्टवर थांबायला सांगण्यात आले. त्या पुढे म्हणाल्या, एअरपोर्ट अधिकाऱ्यांना त्यांना सांगितले की, मला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलावे लागेल. मात्र दोन तासानंतर दुबईमार्गे त्याच विमानाने मला इस्तंबूलला पाठवण्यात आले. यावेळी मला हद्दपार केले गेले, आणि गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात आली. तसेच मला दुबईमध्येही पासपोर्ट दिला गेला नाही, नंतर तो मला इस्तंबूलमध्ये परत देण्यात आला.

भारत सरकार मदत करेल अशी आशा आहे

काबूलमध्ये परिस्थिती बदलली आहे. मला आशा आहे की, भारत सरकार अफगाण महिलांना मदत करेल. त्यांनी माझ्याशी जे काही केले ते चांगले नव्हते. कारगर पुढे म्हणाल्या, हद्दपार करताना मला कोणतेही कारण दिले गेले नाही, जरी हे कदाचित काबूलमधील बदललेल्या राजकीय परिस्थिती आणि सुरक्षेशी संबंधित होते. दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, कारगर यांच्याशी झालेल्या वार्तालापासंबधी आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.

या दोन अफगाण संसद सदस्यांचे देशात स्वागत करण्यात आले

कारगरच्या हद्दपारीनंतर दोन दिवसांनी भारताने अफगाणिस्तानचे दोन शीख खासदार नरिंदर सिंग खालसा आणि अनारकली कौर होनार्याड यांचे स्वागत केले. होनार्याड या अफगाणिस्तानच्या संसदेत प्रवेश करणाऱ्या पहिली शीख महिला आहेत. कारगर यांच्याऐवजी ते भारताने चालवलेल्या विमानाने दिल्लीला पोहोचले. कारगर म्हणाल्या की, ही उड्डाणे केवळ भारतीय आणि अफगाण भारतीयांसाठी होती, अफगाणांसाठी नव्हती.

त्या एकट्याच प्रवास होत्या

कारगर म्हणाल्या की, आगमनाच्या एक दिवस आगोदर माझी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती, त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी त्या इस्तंबूलला परतल्या. पती फहीम आणि चार मुले इस्तंबूलमध्ये असताना त्या एकट्याच प्रवास करत होत्या. फहीम कारगर हे लोकसभेचे चीफ ऑफ स्टाफ आहेत. जुलैच्या अखेरीस हे कुटुंब इस्तंबूलला आले.

गांधीजींच्या देशाकडून अशी कोणतीही अपेक्षा नव्हती

कारगर म्हणाले की, गांधीजींच्या भारताकडून मला याची कधीच अपेक्षा नव्हती. आम्ही नेहमीच भारताचे मित्र आहोत. भारताशी आपले ऐतिहासिक आणि सामरिक संबंध आहेत. या स्थितीत एक महिला आणि एका खासदाराने अशी वागणूक दिली. त्याने मला विमानतळावर सांगितले, "क्षमस्व, आम्ही तुमच्यासाठी काहीही करु शकत नाही."

काबूलला परत येऊ शकत नाही

1985 मध्ये मजार-ए-शरीफ येथे जन्मलेल्या त्या तुर्कमेन आहेत, आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. त्या स्वतःला महिला हक्क कार्यकर्त्या समजतात. त्यांचे म्हणणे आहे की ती काबूलला परत येऊ शकत नाही कारण तिथली परिस्थिती बदलली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मी आता इस्तंबूलमध्ये राहणार आहे, आणि पुढे काय होते ते त्याची प्रतीक्षा करणार. तालिबान सरकारच्या काळात महिलांना संसदेत बसण्याची परवानगी आहे का ते पाहू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT