Nancy Pelosi Dainik Gomantak
ग्लोबल

Nancy Pelosi Taiwan Visit: नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल, चीनने अमेरिकेला दिली युध्दाची धमकी

America Vs China: अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Nancy Pelosi Taiwan Visit: अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्या आहेत. यातच चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांनी आपापल्या युद्धनौकाही तैनात केल्या आहेत. त्याचबरोबर तैवाननेही सीमेवर लष्कर तैनात केले आहे. नॅन्सी पेलोसी ज्या भागाला भेट देणार आहेत, त्या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पेलोसी तैवानला जाणार असल्याच्या बातम्या आल्यापासून चीनकडून सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या. यातच आता चीनने थेट युद्धाचाच अमेरिकेला इशारा दिला आहे.

तैवान म्हणाला - आम्हीही तयार आहोत

तैवान स्थानिक मीडियानुसार, अमेरिकन सिनेटर नॅन्सी पेलोसी मंगळवारी रात्री तैवानला पोहोचल्या आहेत. तैवानमध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तैवानमध्ये त्या ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत, तेथेही सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे.

पीएलए आक्रमक, उड्डाणे रद्द

चिनी सैन्य तैवानजवळ लष्करी कवायती करत आहे. वाढता तणाव पाहता या भागात प्रवासी विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. तैवान आणि अमेरिकन मीडियाचे म्हणणे आहे की, नॅन्सी पेलोसी मंगळवारी रात्री तैवानमध्ये दाखल झाल्या. तैवानला भेट देणाऱ्या पेलोसी गेल्या 25 वर्षांतील पहिल्या अमेरिकन सदस्या आहेत.

दुसरीकडे, पेलोसी यांच्या दौऱ्याला चीन (China) चिथावणी देणारे कृत्य म्हणत आहे. असे करुन अमेरिका आपल्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला आव्हान देत असल्याचे चीनचे म्हणणे आहे. चीनने आपली लढाऊ विमाने तैवान सीमेवर तैनात केली आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अनेक युद्धनौकाही तैनात करण्यात आल्या आहेत.

युद्धाचा धोका

तैवानजवळ दोन चिनी विमानवाहू जहाजे तैनात करण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर अमेरिकेनेही आपल्या युद्धनौका या बेटाजवळ तैनात केल्या आहेत. 1970 नंतर पहिल्यांदाच परिस्थिती एवढी गंभीर झाली असून युद्धाचा धोका निर्माण झाल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. मंगळवारी चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पुन्हा एकदा अमेरिकेला इशारा दिला. त्यांनी पुढे म्हटले की, 'अमेरिका तैवानमध्ये (Taiwan) तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याला सर्वस्वी अमेरिका (America) जबाबदार असेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: “लिटल फॅट, ब्लॅक शर्ट”! नाव, टेबल नंबर सोडून थेट बॉडी-शेमिंग; बंगळुरुमधील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या कारभारानं खळबळ

Mhadei Water Dispute: 'म्हादईला आई म्हणणे सोपे, वाचविणे कठीण'; न्यायालयीन लढ्यात सरकारची उदासीनता! राजेंद्र केरकर यांची टीका

Myanmar Military Airstrike: म्यानमारमध्ये लष्कराचा बौद्ध मठावर भीषण हवाई हल्ला! 14 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी

Saligao Constituency: साळगाव मतदारसंघामध्ये चुुरस, जयेश साळगावकर यांचा राजीनामा; केदार नाईकांपुढे पेच

Illegal Night Clubs: 'टिटोज लेन'वरील 17 नाईट क्लब्स रडारवर; आणखी 4 क्लबवर कारवाई, बेकायदा बांधकामांवर हातोडा

SCROLL FOR NEXT