Indian Army  Dainik Gomantak
ग्लोबल

मोदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला मिळेल लष्करी उत्तर, Indo-China युद्धही होण्याची शक्यता- US इंटेलिजन्स

भारत पाकिस्तानच्या चिथावणीला लष्करी उत्तर देण्याची शक्यता अधिक आहे.

Pramod Yadav

PM Modi on Pakistan: भारत आणि पाकिस्तान तसेच, भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे. या देशांमधील संघर्षही वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारत पाकिस्तानच्या चिथावणीला लष्करी उत्तर देण्याची शक्यता अधिक आहे.

अशी माहिती अमेरिकन इंटेलिजन्स कम्युनिटीच्या वार्षिक धोका मूल्यांकन अहवालात देण्यात आली आहे. भारत आणि चीन यांच्या सीमेवरील वादग्रस्त भागावर वाढत्या लष्करी हालचालींमुळे त्यांच्यात देखील सशस्त्र संघर्षाचा धोका वाढत आहे. असे या अहवालात म्हटले आहे.

'भारत आणि चीन द्विपक्षीय सीमा चर्चेत गुंतले आहेत आणि सीमा मुद्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, 2020 मध्ये दोन्ही देशांमध्ये संबंध ताणले होते, जे दशकातील सर्वात गंभीर आहेत.' असे अहवालात म्हटले आहे.

'भारत आणि चीनच्या विवादित सीमेवर दोन्ही देशांनी विस्तारित केलेल्या लष्करामुळे दोन्ही अणुशक्तीसज्ज देशात सशस्त्र संघर्षाचा धोका वाढत आहे. यात अमेरिकन हितसंबंधांना थेट धोका असू शकतो.

नियंत्रण रेषेवर (LAC) संघर्ष वाढण्याची शक्यता असून, यापूर्वी उभय देशात झालेल्या स्टँडऑफने हे दाखवून दिले आहे. 2020 पासून दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण आहेत.' असेही त्यात म्हटले आहे.

भारतविरोधी अतिरेकी गटांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाकिस्तानच्या चिथावणीला लष्करी उत्तर देण्याची भाषा केली आहे.

वाढलेल्या तणाव, काश्मीरमधील हिंसक वातावरण यामुळे भारतात दहशतवादी हल्ला होण्याचा धोका आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सादर करण्यात आलेल्या या अहवालात भारताचे पाकिस्तानसोबतचे संबंध चिंतेचा विषय असल्याचेही म्हटले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पाकिस्तानच्या कोणत्याही चिथावणीला लष्करी प्रत्युत्तर देईल अशी शक्यता अधिक आहे. काश्मीरमधील अशांतता आणि भारतातील दहशतवादी हल्ले यासाठी फ्लॅश पॉइंट ठरू शकतात. असे अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT