Crime News Dainik Gomantak
ग्लोबल

China Crime: धक्कादायक! चीनमध्ये माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू; तर 23 जण जखमी

China Crime News: चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण-पश्चिम चीनमधील रुग्णालयात एका माथेफिरुने लोकांवर चाकूने हल्ला केला.

Manish Jadhav

China Crime News: चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण-पश्चिम चीनमधील रुग्णालयात एका माथेफिरुने लोकांवर चाकूने हल्ला केला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेबाबत समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती रुग्णालयाच्या (Hospital) परिसरात हातात चाकू घेऊन फिरताना दिसत आहे. चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने माहिती देताना सांगितले की, युनान प्रांतात मंगळवारी ही घटना घडली.

एक संशयित अटक

अज्ञात अधिकाऱ्यांचा हवाला देत गुइझोउ प्रांतीय टेलिव्हिजनच्या ऑनलाइन पोस्टने सांगितले की, या हल्ल्यात सुमारे 23 लोक जखमी झाले आहेत. एका संशयिताला अटक करण्यात आल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे. झाओटाँग शहरातील झेंक्सिओंग काउंटी पीपल्स हॉस्पिटलमध्ये हा हल्ला झाला. या हल्ल्यामागे नेमके काय कारण होते आणि हल्लेखोराचा हेतू काय होता याचा तपास केला जात आहे. चीनच्या (China) नैऋत्य युनान प्रांतातील जेनक्सिओंग काउंटीमध्ये ही घटना घडली.

चीनमध्ये घटना वाढल्या आहेत

अलीकडच्या काळात चीनमध्ये अशा घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात युनान प्रांतात एका व्यक्तीने लोकांवर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जण ठार तर सात जण जखमी झाले होते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांतातील किंडरगार्टनमध्ये चाकूने हल्ला करुन सहा जणांचा मृत्यू झाला होता तर एक जण जखमी झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT