Tallest Tree Dainik Gomantak
ग्लोबल

Tallest Tree: जगातील 'या' सर्वात उंच झाडावळ जाण्यासाठी का आहे बंदी? जाणून घ्या कारण

California: जगातील या सर्वात उंच झाडाचे नाव 'हायपेरियन' आहे. 2006 मध्ये याचा शोध लागला. एका जोडप्याने ते शोधून काढले होते. या झाडाचे नाव ग्रीक पौराणिक कथेवरुन घेतले आहे.

Manish Jadhav

Tallest Tree: तुम्ही खूप उंच झाडं पाहिली असतील. पण कुतुबमिनारपेक्षा उंच झाड तुम्ही पाहिलय का? होय, आम्ही जगातील सर्वात उंच झाडाबद्दल बोलत आहोत, ज्याची उंची सुमारे 115.85 मीटर आहे.

म्हणजेच ही उंची इतकी जास्त आहे की, त्याच्या समोर कुतुबमिनार आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लहान दिसतील. जगातील या सर्वात उंच झाडाचे नाव 'हायपेरियन' आहे.

2006 मध्ये याचा शोध लागला. एका जोडप्याने ते शोधून काढले होते. या झाडाचे नाव ग्रीक पौराणिक कथेवरुन घेतले आहे.

दरम्यान, 115.85 मीटर उंचीमुळे या झाडाच्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. हे जगातील सर्वात उंच झाड मानले जाते. हे कॅलिफोर्नियाच्या (California) नॅशनल पार्कमध्ये आहे, ते इतके उंच आहे की, ते दुरुन सहज पाहिले जाऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल पार्कमध्ये जाणाऱ्या लोकांना या झाडाजवळ जाण्यास मनाई आहे. या झाडाजवळ कोणी गेल्यास त्याला 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असे सांगितले जाते. यासोबतच त्याला 4 लाख रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो.

या झाडाची खासियत काय आहे?

हे झाड एका वर्षात 700 किलोग्रॅम ऑक्सिजन (Oxygen) देते. एवढेच नाही तर वर्षभरात हे झाड सुमारे 20 टन कार्बन डायऑक्साइड स्वतःमध्ये शोषून घेते.

हे झाड वॉटर फिल्टरचे काम करते!

या झाडाखाली उन्हाळ्यातही तापमान 4 अंशांपर्यंत घसरते. Hyperion नावाचे हे झाड एका वर्षात सुमारे 1 लाख चौरस मीटर दूषित हवा फिल्टर करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT