Taliban will not work with USA Afghanistan Islamic State Issue Dainik Gomantak
ग्लोबल

Islamic State Issue: तालिबानचा अमेरिकेला धक्का

अमेरिकेचे अधिकारी शनिवारी आणि रविवारी कतारची राजधानी दोहा येथे तालिबानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भेटत आहेत.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानातील (Afghanistan) दहशतवादी संघटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेला (USA) सहकार्य करण्याची शक्यता तालिबानने (Taliban) नाकारत अमेरिकेला ,मोठा धक्का दिला आहे. ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने (US Army) पूर्ण माघार घेतल्यानंतर अमेरिका आणि तालिबान यांच्यातील पहिल्या थेट चर्चेदरम्यान दहशतवाद या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर कठोर भूमिका घेतल्याचे म्हटले आहे (Islamic State). अमेरिकेचे अधिकारी शनिवारी आणि रविवारी कतारची राजधानी दोहा (Doha) येथे तालिबानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भेटत आहेत.(Taliban will not work with USA Afghanistan Islamic State Issue)

अमेरिका आणि तालिबान यांच्यातील या बैठकीचा मुख्य हेतू म्हणजे परदेशी नागरिकांना आणि अशा अफगाण लोकांना बाहेर काढण्याची सोय करणे आहे ज्यांना तिथे धोका आहे. याशिवाय अफगाणिस्तानातील अतिरेकी गटांवर नियंत्रण ठेवण्याबाबतही चर्चा होऊ शकते. दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती. ऑगस्टमध्ये अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर ही पहिलीच बैठक आहे.

तालिबानचे राजकीय प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले आहे की, ते वॉशिंग्टनला अफगाणिस्तानातील वाढत्या सक्रिय इस्लामिक स्टेट ग्रुपशी संबंधित संघटनांबाबत कोणतेही समर्थन देणार नाही. शाहीन म्हणाले , "आम्ही स्वतःच इस्लामिक स्टेट ला सामोरे जाण्यास सक्षम आहोत."पूर्व अफगाणिस्तानमध्ये आयएसने 2014 पासून देशातील शिया मुस्लिम समुदायावर सतत हल्ले केले आहेत. तो देखील अमेरिकेसाठीही मोठा धोका आहे. मशिदीवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात या संबंधित संघटनेचाही सहभाग होता, ज्यामध्ये अल्पसंख्यांक शिया समुदायाचे 46 लोक मारले गेले होते.

दरम्यान अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, कतारच्या दोहा येथे होणाऱ्या या चर्चेमध्ये अमेरिका अफगाणिस्तानातील अमेरिकन लोक, परदेशी नागरिक आणि अफगाणिस्तानचे सहयोगी जे अमेरिकन सरकार आणि लष्कराला पाठिंबा देत आहेत त्यांना अफगाणिस्तानातून बाहेर पडू देण्याच्या वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT