Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबान 'मेड इन पाकिस्तान' शस्त्रांचा करतोय वापर: पाकिस्तानी सिनेटरचा दावा

दरम्यान, पाकिस्तानच्या माजी सिनेटरने आपल्याच देशावर तालिबानचे समर्थन केल्याचा आरोप केला आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) दोन तृतीयांशपेक्षा जास्त भाग ताब्यात घेतल्यानंतर तालिबान (Taliban) आता राजधानी काबुलच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या माजी सिनेटरने आपल्याच देशावर तालिबानचे समर्थन केल्याचा आरोप केला आहे. अवामी नॅशनल पार्टी (एएनपी) चे सदस्य अफरासियाब खटक (Afrasiab Khattak) एका मुलाखतीदरम्यान म्हणाले, 'तालिबानच्या वाढत्या कब्जामुळे पाकिस्तान खूप आनंदी आहे. तो तालिबानला पूर्ण सहकार्य करत आहे. तालिबान हे अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या धोरणात्मक धोरणाचे एक साधन आहे.

माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत खटक म्हणाले, 'मला वाटते की तालिबानच्या कब्जामुळे पाकिस्तान खूश आहे. या धोरणाला आकार देण्यात सरकारची कोणतीही भूमिका नाही. ' एका ट्विटमध्ये ते म्हणाले, 'तालिबान्यांकडे असलेल्या शस्त्रास्त्रांवर आणि दारूगोळ्यावर मेड इन पाकिस्तान लिहिलेले आहे. तालिबान पाकिस्तानकडून प्रशिक्षण, पुरवठा आणि निवारा यावर पूर्णपणे अवलंबून आहेत. अफगाण सैन्य कोणत्याही परदेशी मदतीशिवाय युद्ध लढत आहे. यापूर्वी कधीही असे घडले नव्हते. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कंधार आणि हेरातवर तालिबान्यांचा कब्जा

9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेसह नाटो देशांचे सैन्य अफगाणिस्तानात दाखल झाले होते, त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी हे सैनिक आता माघारी परतले आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की, तालिबान 90 दिवसांच्या आत राजधानी काबूल काबीज करेल. तालिबानी दहशतवाद्यांनी आतापर्यंत अफगाणिस्तानचा अनेक मोठा भाग काबीज केला आहे, ज्यात कंधार हे दुसरे सर्वात मोठे शहर आणि हेरात हे तिसरे मोठे शहर आहे. हा हिंसाचार संपवण्यासाठी अफगाणिस्तान सरकारने कतारमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेदरम्यान (Afghanistan Taliban Control) तालिबानला मोठी ऑफरही दिली आहे. सरकारने तालिबानला सांगितले आहे की, जर लढाई संपली तर अफगाण सरकार सत्तेचे विभाजन करण्यास तयार असेल.

काबूलच्या दिशेने अफगाण नागरिकांची कूच

अफगाणिस्तानच्या बिघडलेल्या परिस्थितीमध्ये भारतासह जगातील अनेक देशांनी आपल्या नागरिकांना येथून निघून जाण्यास सांगितले आहे. अफगाणिस्तान (Taliban Controls Afghanistan) मध्ये निर्वासितांचे संकटही आले आहे. देशातील विविध प्रांतातील लोक सुरक्षिततेसाठी राजधानी काबूलच्या दिशेने धावत आहेत. येथे लोकांना रस्त्यावर राहण्यास भाग पाडले जाते. देशाच्या अनेक भागांमध्ये तालिबान आणि अफगाण सैन्य यांच्यात युद्ध सुरू आहे. पण तरीही लष्करासमोर तालिबान मजबूत दिसत आहे. ताज्या माहितीनुसार, तालिबानने आतापर्यंत देशातील 18 प्रांतीय राजधान्या ताब्यात घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT