Afghanistan Women Dainik Gomantak
ग्लोबल

Taliban New Penal Code: बायकोला हाडं तुटेपर्यंत मारणं आता 'कायदेशीर', तालिबानचा नवा क्रूर कायदा; अफगाणिस्तानात पुन्हा महिलांच्या हक्कांची पायमल्ली

Taliban New Penal Code 2026: तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हक्कांची पायमल्ली करणारा एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर कायदा लागू केला आहे.

Manish Jadhav

Afghanistan Domestic Violence Law: तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हक्कांची पायमल्ली करणारा एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर कायदा लागू केला आहे. नव्या दंड संहितेनुसार, नवऱ्याने आपल्या बायकोला किंवा मुलांना मारहाण करणे आता 'वैध' मानले जाणार आहे, जोपर्यंत त्या मारहाणीत शरीराचे हाड तुटत नाही किंवा जखमा होत नाहीत. तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंदजादा याने या 90 पानांच्या नव्या कायद्यावर स्वाक्षरी केली असून यामुळे जागतिक स्तरावर संतापाची लाट उसळली आहे.

कायद्यातील अघोरी तरतुदी

तालिबानच्या (Taliban) या नव्या कायद्यानुसार, नवऱ्याने बायकोविरुद्ध बळाचा वापर केला आणि त्यात हाड मोडले किंवा गंभीर जखम झाली, तरीही नवऱ्याला केवळ 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे, ही हिंसा सिद्ध करण्याची जबाबदारीही पीडित महिलेवरच टाकण्यात आली आहे. अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलेला न्यायालयात स्वत:च्या जखमा न्यायाधीशांसमोर दाखवाव्या लागतील. इतकेच नाही तर, ज्या नवऱ्याविरुद्ध ती तक्रार करत आहे, तो किंवा घरातील अन्य एखादा पुरुष सोबती न्यायालयात उपस्थित असणे अनिवार्य करण्यात आले.

कोणाला सूट?

या कायद्याच्या 'अनुच्छेद 9' नुसार अफगाण समाजाची उलेमा (धार्मिक विद्वान), अश्रफ (कुलीन वर्ग), मध्यम वर्ग आणि निम्न वर्ग अशा चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एखाद्या गुन्ह्याची शिक्षा ही गुन्ह्याच्या तीव्रतेवरुन नाही, तर गुन्हेगाराच्या सामाजिक स्थानावरुन ठरवली जाणार आहे. जर एखाद्या धार्मिक विद्वानाने गुन्हा केला तर त्याला केवळ 'सल्ला' दिला जाईल, कुलीन वर्गातील गुन्हेगाराला न्यायालयात (Court) बोलावून समज दिली जाईल, तर निम्न वर्गातील व्यक्तीला त्याच गुन्ह्यासाठी तुरुंगवास आणि शारीरिक यातना दिल्या जातील.

महिलांच्या स्वातंत्र्यावर पूर्णतः गदा

तालिबानने 2009 चा 'महिलांवरील हिंसाचार निर्मूलन कायदा' (EVAW) पूर्णपणे रद्द केला. आता जर एखादी विवाहित महिला आपल्या नवऱ्याला न सांगता किंवा त्याची परवानगी न घेता नातेवाईकांना भेटायला गेली, तर तिला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल. मानवाधिकार संघटनांच्या मते, या कायद्यावर चर्चा करणे किंवा त्याविरुद्ध बोलणे हादेखील आता गुन्हा मानला जात असल्याने अफगाणिस्तानातील नागरिक दहशतीखाली आहेत. सुधारणावादी सेवांऐवजी आता इस्लामी धर्मगुरुच गुन्हेगारांना शारीरिक शिक्षा देण्याचे काम करणार आहेत, ज्यामुळे ही व्यवस्था अधिक क्रूर होण्याची भीती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT