Taiwan: भारत आणि तैवान यांच्यात नोकऱ्यांबाबत एक महत्त्वाचा करार होणार आहे. या करारानुसार एक लाख भारतीय कामगारांना तैवानमध्ये नोकऱ्या मिळणार आहेत. खरं तर, तैवानमधील बेरोजगारीचा दर नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
तैवानमध्ये उत्पादन, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज आहे, जी त्याला स्वतःच्या देशात मिळत नाही. अशा स्थितीत त्यांनी भारताकडे तडजोडीचा हात पुढे केला आहे. तैवान आणि भारत यांच्यातील या करारावर लवकरच स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर एक लाख भारतीय नोकरीसाठी तैवानमध्ये जातील. दरम्यान, इस्रायलने नुकतेच एक लाख भारतीयांना नोकऱ्या देऊ केल्या आहेत.
भारत आणि तैवानमधील हा करार अंतिम टप्प्यात आहे. समोर आलेल्या माहीतीनुसार, पुढील महिन्यात भारत आणि तैवानमध्ये नोकऱ्यांबाबत करार होऊ शकतो. त्यानंतर तैवानमध्ये नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू होईल. तैवानने भारतातील कुशल कामगारांना त्यांच्या देशातील कामगारांच्या बरोबरीने पगार आणि विमा यासारख्या सर्व सुविधा देण्याची ऑफर दिली आहे.
तैवान लोकसंख्येच्या वृद्धत्वामुळे त्रस्त आहे. पुढील दोन वर्षांत, म्हणजे 2025 पर्यंत, तैवानची 20 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या 80 वर्षांची होईल. तैवानशिवाय अनेक देशही या समस्येने त्रस्त आहेत.
नुकतेच इस्रायलने बांधकाम आणि नर्सिंग क्षेत्रात एक लाख भारतीयांना नोकऱ्या देऊ केल्या आहेत. भारताने जपान, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्ससह 13 देशांशी करार केले आहेत. यापैकी बहुतेक देश वृद्ध लोकसंख्येच्या समस्येने त्रस्त आहेत.
भारत आणि तैवानमधील संबंध सातत्याने सुधारत आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूकही सातत्याने वाढत आहे. कामगारांबाबतच्या कराराव्यतिरिक्त भारत तैवानमधून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आयातही करत आहे. तैवान आणि भारत यांच्यातील व्यापार 2001 ते 2022 पर्यंत $1.19 अब्जने वाढून $8.4 अब्जपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, तैवानबरोबर केलेल्या या करारामुळे चीन आणि भारतातील संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.