Hindu Temple Dainik Gomantak
ग्लोबल

Australia: 'भजन बंद करा, नाहीतर...', आता हिंदू मंदिराला धमक्या; वाचा संपूर्ण प्रकरण

Hindu Temple: ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरांच्या तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. कधी हिंदू मंदिरांच्या भिंतींवर आक्षेपार्ह लिहिले जाते, तर कधी धमक्या दिल्या जात आहेत.

Manish Jadhav

Australia: ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरांच्या तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. कधी हिंदू मंदिरांच्या भिंतींवर आक्षेपार्ह लिहिले जाते, तर कधी धमक्या दिल्या जात आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याला धमकी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेलबर्नच्या हिंदू काली माता मंदिराच्या पुजाऱ्याला 'भजन बंद करा, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल' अशी धमकी देण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, धमकी देणारा व्यक्ती पंजाबी भाषेत बोलत होता. मंदिराच्या पुजारी भावना यांनी सांगितले की, मंगळवारी मला कॉलर आयडीवरुन कॉल आला. पंजाबीत बोलणाऱ्या या व्यक्तीने 4 मार्चला होणारा भजनाचा कार्यक्रम रद्द करण्याची धमकी दिली. तो म्हणाला की, भजन गाणारी व्यक्ती कट्टर हिंदू आहे, तो आला की गोंधळ घालतो.

मेलबर्नच्या हिंदू मंदिरात 4 मार्च रोजी भजनाचा कार्यक्रम होणार

वास्तविक, 4 मार्च रोजी या मंदिरात भजनाचा कार्यक्रम होणार आहे. जिथे एक गायक भजन गाणार आहे. पुजारी भावना यांनी सांगितले की, धमकी देणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, 'तुम्हाला माहित आहे की, गायक कट्टर हिंदू (Hindu) आहे. तो आला तर मंदिरात गोंधळ उडेल.

भावना यांनी पुढे सांगितले की, मी त्यांना विनंती केली की, 'भाऊ, हे माँ कालीचे मंदिर आहे, गुरू महाराज (Guru Gobind Singh) सुद्धा इथे प्रार्थना करायचे.'

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. याआधी जानेवारी महिन्यातही ऑस्ट्रेलियात (Australia) तीन मंदिरांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती. यामागे खलिस्तान समर्थकांचा हात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT