Sri Lanka Vesak Festival Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Drunk Driver Rams Crowd Colombo: कोलंबोच्या उपनगरात एका बौद्ध धार्मिक उत्सवादरम्यान भरधाव आणि मद्यधुंद पिकअप चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भाविकांच्या गर्दीला चिरडले.

Manish Jadhav

Drunk Driver Rams Crowd Colombo: श्रीलंकेतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. कोलंबोच्या उपनगरात एका बौद्ध धार्मिक उत्सवादरम्यान भरधाव आणि मद्यधुंद पिकअप चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भाविकांच्या गर्दीला चिरडले. या भीषण अपघातात 6 लोकांचा जागीच मृत्यू झाला असून एका लहान बालकासह 13 जण गंभीर जखमी झाले. हा संपूर्ण अपघात रविवारच्या रात्री कोलंबो शहराच्या बाहेरील भागात असलेल्या मीगोडा या उपनगरात घडला, जिथे मोठ्या संख्येने लोक 'वेसाक' उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. अपघाताच्या वेळी रस्त्याच्या कडेला मोफत महाप्रसाद घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती आणि लोक जेवणाची वाट पाहत उभे होते, त्याचवेळी हा काळ अंगावर धावून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की पिकअपच्या धडकेमुळे अनेक जण हवेत फेकले गेले. मृतांमध्ये 35 ते 38 वर्षे वयोगटातील तीन पुरुष आणि 15 ते 56 वर्षे वयोगटातील तीन महिलांचा समावेश आहे. जखमी झालेल्या सर्व 13 लोकांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्राथमिक तपासानुसार, अपघातानंतर 42 वर्षीय पिकअप चालक घटनास्थळावरुन फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून काही अंतरावरच त्याला बेड्या ठोकल्या. या चालकाने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले होते आणि नशेत गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळेच हा भयानक अपघात घडल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.

'वेसाक' हा बौद्ध धर्मीय अनुयायांचा जगभरातील आणि विशेषतः श्रीलंकेतील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. हा सण भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मोत्सव, त्यांना प्राप्त झालेले ज्ञान (बोधित्व) आणि त्यांचे महापरिनिर्वाण यांच्या स्मृतीप्रित्यार्थ दरवर्षी मे महिन्यातील पहिल्या पूर्णिमा दिनी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. या पवित्र आणि ऐतिहासिक सणाचे औचित्य साधून श्रीलंकेत बौद्ध श्रद्धाळू आणि विविध संस्थांमार्फत रस्त्यांच्या कडेला मोफत जेवण, अल्पोपहार आणि थंड पेयांचे स्टॉल्स लावले जातात. यामुळेच या उत्सवादरम्यान रस्त्यांवर सर्वसामान्यांची आणि भाविकांची प्रचंड गर्दी उसळते.

मात्र, एका बेजबाबदार आणि मद्यधुंद चालकामुळे या पवित्र आनंदोत्सवाचे रुपांतर अत्यंत मोठ्या दुःखात आणि आक्रोशात झाले. या घटनेमुळे संपूर्ण श्रीलंकेत (Sri Lanka) हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT