Gotabaya Rajapaksa Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka: दुबईला पळून जाताना राष्ट्रपतींना रोखलं, 'अर्थमंत्र्यांना पाहताच प्रवाशांनी...'

माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी आंदोलनादरम्यान आंतरराष्ट्रीय विमानाने दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमन्तक

Sri Lanka Political Crisis: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पूर्व अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी आंदोलनादरम्यान आंतरराष्ट्रीय विमानाने दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखले आणि इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्यांच्या प्रवासाला मंजुरी देण्यास नकार दिला. बासिल राजपक्षे आज सकाळी कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्हीआयपी टर्मिनलमधून दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु लोकांनी त्यांना देश सोडण्यास रोखलं. त्यामुळे त्यांना आता श्रीलंकेतच राहावं लागणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते 12:15 वाजता चेक-इन काउंटरवर पोहोचले होते. परंतु इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्यांना मंजुरी देण्यास नकार दिल्याने ते 3:15 पर्यंत तिथेच थांबले. अखेर त्यांना विमानतळ (Airport) सोडून परत जावे लागले.

दरम्यान, भारतीय सरकारी सूत्रांनी बासिल राजपक्षे यांना भारतात आश्रय दिल्याचे वृत्त फेटाळून लावले. प्रचंड आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजीनामा देणारे राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी भारतात (India) आश्रय घेतल्याचेही सूत्रांनी नाकारले आहे.

दुसरीकडे, सूत्रांनी सूचित केले की, श्रीलंकेच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याला देशाबाहेर जाऊ दिले जात नाही. श्रीलंका (Sri Lanka) सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. विरोधकांनी राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावर कब्जा केला आहे.

विमानतळावर राष्ट्रपतींच्या चार विमानांनी उड्डाण केले

अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएफपीने वृत्त दिले आहे की, 'श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनाही विमानतळावर अपमानाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना देश सोडू दिला नाही. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना पदावर असताना अटक करता येत नाही. परंतु अटकेपूर्वी त्यांना देश सोडायचा आहे, असे मानले जाते.'

दुसरीकडे, इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्यांच्या पासपोर्टवर शिक्का मारण्यासाठी व्हीआयपी सूटमध्ये जाण्यास नकार दिला. विमानतळावरील इतर लोक आपल्या विरोधात जातील अशी भीती त्यांना वाटत होती. दुबईला जाणारी चार उड्डाणे निघाल्यानंतर अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीने मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावरील लष्करी तळावर रात्र काढली. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले होते. राष्ट्रपती भवनातून अनेक दशलक्ष रोकड आणि गुप्त बंकर मिळाल्याचेही वृत्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT