Marriage Dainik Gomantak
ग्लोबल

Weird Marriage Tradition: स्पर्म व्हेलचा दात ठरवतो 'लग्न', या देशातील अजब प्रथा जाणून तुम्हीही म्हणाल...

Weird Marriage Tradition: लग्नाबाबत अनेक शतकांपासून जगभरात अगणित प्रथा चालत आल्या आहेत.

Manish Jadhav

Weird Marriage Tradition: लग्नाबाबत अनेक शतकांपासून जगभरात अगणित प्रथा चालत आल्या आहेत. भारतातही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नियम आणि रितीरिवाजांनी लग्न लावले जाते.

जगाविषयी बोलायचे झाल्यास, असे अनेक देश आहेत, जिथे लग्नासंबंधित खूप विचित्र प्रथा आहेत. पण हे विधी पूर्ण केल्याशिवाय लग्नाचा विचारही केला जात नाही. आज आम्‍ही तुम्हाला फिजी या देशातील लग्नासंबंधीच्या विचित्र प्रथेबद्दल सांगणार आहोत.

दरम्यान, फिजीमध्ये विवाह हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जातो. इथे मुलाला लग्नासाठी विचित्र प्रथा पाळावी लागते. जोपर्यंत मुलगा स्पर्म व्हेलचे दात आणत नाही तोपर्यंत मुलीचे कुटुंबीय त्याला स्वीकारत नाहीत.

दुसरीकडे, फिजी हा एक छोटासा देश आहे, जिथे आजही जुन्या प्रथा चालू आहेत. त्यापैकी एक म्हणजे स्पर्म व्हेल माशाचे दात काढण्याची प्रथा. लग्नासाठी मुलाला व्हेलच्या दातांचा हार आणायचा असतो. मुलगा व्हेलच्या दातांचा हार आणतो आणि मुलींसमोर लग्नाचा (Marriage) प्रस्ताव ठेवतो.

तसेच, स्पर्म व्हेलच्या दातांना फिजीमध्ये टाबुआ म्हणतात. टाबुआ म्हणजे पवित्र. असे मानले जाते की, जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याला टाबुआ भेट देते तेव्हा तो त्याचे समर्पण दर्शवतो. याद्वारे तो दाखवतो की, हे नाते त्याच्यासाठी सर्वात अमूल्य आहे.

त्याचबरोबर, टाबुआ भेट दिल्यानंतरच मुलीचे कुटुंबीय मुलीचा (Girl) हात मुलाच्या हातात देतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे टाबुआ मिळणे सोपे नाही.

बाजारात त्याची किंमतही खूप जास्त आहे. टाबुआची किंमत हजारो डॉलर्समध्ये असू शकते. 1 किलो दाताची किंमत 80 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

बरेच लोक याला आपला आदर मानतात आणि अनेक व्हेलच्या दातांचा हार बनवतात. तर दुसरीकडे, काही लोक धाग्यात एकच दात विणून हार तयार करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT