South Africa Accident Dainik Gomantak
ग्लोबल

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

South Africa Accident: दक्षिण आफ्रिकेतून गुरुवारी (29 जानेवारी) एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली.

Manish Jadhav

South Africa Accident: दक्षिण आफ्रिकेतून गुरुवारी (29 जानेवारी) एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली. देशाच्या पूर्व क्वाजुलु-नेटाल प्रांतातील डरबन शहराच्या जवळ एका मिनीबस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तब्बल 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शालेय विद्यार्थ्याचाही समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी आणि आपत्कालीन सेवांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठवड्यात अशाच प्रकारच्या एका अपघातात 14 शालेय मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा अशाच भीषण दुर्घटनेने देश हादरला आहे.

प्रांतीय परिवहन विभागाचे अधिकारी सिबोनिसो दूमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भयानक होता की 11 प्रवाशांचा जागीच अंत झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने अचानक 'यू-टर्न' घेण्याचा प्रयत्न केला, ज्याकडे मिनीबस चालकाचे लक्ष गेले नाही आणि ही भीषण धडक झाली. खासगी पॅरामेडिक सेवा पुरवठादार एएलएस पॅरामेडिक्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मिनीबसचा चालक गाडीच्या ढिगाऱ्यात अडकून पडला होता, त्याला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी हा आठवडा अपघातांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी ठरला आहे. याआधी 19 जानेवारी रोजी जोहान्सबर्गच्या जवळ शालेय मुलांनी भरलेल्या मिनीबसचा असाच एका ट्रकशी भीषण अपघात झाला होता. त्या घटनेत 14 चिमुरड्यांचा बळी गेला होता. त्या प्रकरणातील 22 वर्षीय मिनीबस चालकावर बेजबाबदारपणे वाहन चालवल्याचा आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा ठपका ठेवत त्याला अटक करण्यात आली.

त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेमध्ये मिनीबस टॅक्सी हे सार्वजनिक वाहतुकीचे सर्वात मोठे साधन मानले जाते. जवळपास 70 टक्के नागरिक कामावर जाण्यासाठी किंवा प्रवासासाठी याच वाहनांचा वापर करतात, मात्र वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

VIDEO: लाईव्ह सामन्यात कुत्र्याचा धुमाकूळ! चेंडू घेत पळाला अन्... पाहा व्हिडिओ

Ajit Pawar: खासदारकी सोडून महाराष्ट्रात रमले अन् अखेरपर्यंत राज्याचं राजकारण गाजवलं; 'दादा' नावाचं वादळ शांत झालं!

SCROLL FOR NEXT