Donald Trump Attack: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या विवादित वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. यातच आता, पुन्हा एकदा ट्रम्प चर्चेत आले आहेत. अमेरिकेत शनिवारी ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाल्याने अवघी अमेरिका हादरली.
एका रॅलीला संबोधित करत असताना एका हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर एकामागून एक गोळ्या झाडल्या. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या कानातून रक्त येताना दिसत आहे. या गोळीबारात ते थोड्क्यात बचावले. या हल्ल्यानंतर त्यांनी स्वत: त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक निवेदन जारी करुन आपल्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी दिली.
दुसरीकडे, सोशल मीडियावर ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यावरुन द सिम्पसनने केलेल्या भाकिताकडे वेधले जात आहे.
दरम्यान, द सिम्पसन त्याच्या हटके अंदाजांसाठी ओळखले जाते. एका वापरकर्त्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेची भविष्यवाणी द सिम्पसनने केल्याच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर राळ उठली.
X वर स्क्रीनशॉट्स शेअर करताना वापरकर्त्याने म्हटले की, "सिम्पसनला काही समजावून सांगायचे आहे."
तर आणखी एका वापरकर्त्याने म्हटले की, "डोनाल्ड ट्रम्प यांना गोळ्या घातल्या जातील असे सिम्पसनने भाकीत केले नव्हते."द सिम्पसनने “खरेतर, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता” हे जाणून काहींना धक्का बसला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.