Snickers Candy Dainik Gomantak
ग्लोबल

स्निकर्स मेकर्सला का मागावी लागली China ची माफी, वाचा सविस्तर

Snickers Candy: स्निकर्स कँडी बारच्या उत्पादकांना चीनची माफी मागावी लागली आहे.

दैनिक गोमन्तक

Snickers Makers: स्निकर्स कँडी बारच्या उत्पादकांना चीनची माफी मागावी लागली आहे. कंपनीने आपल्या जाहिरातीत तैवान हा देश दाखवला होता. स्निकर्सचे निर्माता मार्स रिग्ले यांनी शुक्रवारी स्निकर्स उत्पादन लाँच केल्याबद्दल माफी मागितली. खरे तर, यापूर्वी चिनी सोशल मीडिया यूजर्संनी कँडी बारच्या जाहिरातीमध्ये तैवानला देश म्हणून दाखवण्यात आल्याचे म्हटले होते. स्निकर्स ही अमेरिकन कंपनी मार्स, इनकॉर्पोरेटेडने बनवलेली चॉकलेट बार आहे.

दरम्यान, कंपनीने अलीकडेच स्निकर्स बारची लिमिडेट एडिशन लाँच केली आहे. स्निकर्सची दावा केलेली लिमिडेट एडिशन फक्त दक्षिण कोरिया (South Korea), मलेशिया आणि तैवान या "देशांमध्ये" उपलब्ध आहे. फोटोमध्ये तैवानला (Taiwan) "देश" म्हणून संबोधले आहे. लाँच इव्हेंटमधील फोटो आणि व्हिडिओ चीनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo वर व्हायरल झाले. चीनमध्ये (China) प्रचंड नाराजी पाहून अमेरिकन कंपनीने माफी मागितली.

दुसरीकडे, चीन सातत्याने तैवान हा आपलाच हिस्सा आसल्याचे सांगत आला आहे. तैवान हा आपला भाग आहे आणि एक दिवस तो मुख्य भूमीशी जोडला जाईल, असे चीन म्हणत आहे. बीजिंगने स्वशासित बेटाला मुख्य भूभागाशी जोडण्यासाठी बळाचा वापर करण्याची शक्यता नाकारली नाही.

तथापि, विवाद वाढत असताना, मार्स रिग्ले यांनी शुक्रवारी त्यांच्या स्निकर्स चायना वेइबो आकाऊंटवर माफी मागितली. म्हणजेच, आता तैवानला त्यांच्या जाहिरातीत देश म्हणून संबोधित केले जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT