Former Japanese Prime Minister Shinzo Abe Dainik Gomantak
ग्लोबल

....'म्हणून शिंजो आबेंना गोळ्या घातल्या',शुटरचा मोठा खुलासा

Former Japanese Pm Shinzo Abe Death: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची शुक्रवारी भाषणादरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांची शुक्रवारी एका कार्यक्रमात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीचा असा विश्वास होता की शिंजो आबे एका धार्मिक गटाशी संबंधित आहेत. ज्याने त्याच्या आईला दिवाळखोर केले. आईच्या गरीब आर्थिक परिस्थितीसाठी तो या गटाला जबाबदार धरायचा. शनिवारी पोलिसांनी स्थानिक माध्यमांना माहिती दिली की, ते अनेक महिन्यांपासून अबे यांच्यावर घरगुती बंदुकीने हल्ला करण्याची योजना आखत होते. रस्त्याच्या मध्यभागी एका निवडणूक रॅलीदरम्यान शिंजो आबे यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव तेत्सुया यामागामी असुन तो 41 वर्षाचा आहे.

समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये (Video) , चष्मा घातलेला, राखाडी टी-शर्ट आणि बेज रंगाची पँट घातलेला एक राखाडी केसांचा माणूस आबेंच्या अगदी जवळ येतो आणि एकामागून एक दोन गोळ्या झाडत असल्याचे दिसून येते. त्याने ही हत्या 40 सेमीच्या बंदुकीने केली. जी स्थानिक मीडियानुसार त्याने स्वतः केली होती. त्याची बंदूक काळ्या फितीने गुंडाळलेली होती. त्याने गोळीबार करताच तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

अनेक दिवसांपासून याची योजना आखली होती

रॉयटर्सच्या वृत्तानुसार शुटरच्या शेजाऱ्यांशी बोलल्यानंतर तो एकटा आणि शांत राहतो असे आढळून आले. क्योडो न्यूज एजन्सीने, तपास सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, अबे यांनी एका धार्मिक गटाला पाठिंबा दिला होता, ज्याला त्यांची आई देणगी देऊन दिवाळखोर झाली होती.

क्योडो आणि इतर स्थानिक प्रसारमाध्यमांनी पोलिसांचा हवाला देत म्हटले आहे की, शुटरने चौकशीदरम्यान सांगितले की, "माझी आई एका धार्मिक गटाच्या प्रेमात पडली होती आणि मला ते अजिबात आवडत नव्हते." यावर नारा पोलिसांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. या धार्मिक गटाचे नावही मीडियात आलेले नाही.

यामागामीने बंदूक बनवण्यासाठी अनेक भाग ऑनलाइन ऑर्डर केले होते. अनेक महिन्यांपासून हत्येची तयारी करत असल्याची माहिती आहे. तो संधी शोधत आबेच्या इतर मोहिमांमध्येही गेला होता. हत्येच्या एक दिवस आधी तो एका मोहिमेत सहभागी होण्यासाठी 200 किमी दूर गेला होता. राज्य वृत्तसंस्था NHK ने वृत्त दिले की त्याने बंदुकीवर हल्ला करण्यापूर्वी बॉम्ब वापरण्याचा विचार केला होता, परंतु नंतर बंदुकीचा वापर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Goa Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy 2026: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT