Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: कंगाल पाकिस्तान उद्या साजरा करणार काश्मीर एकता दिवस, जनता बेहाल...!

Kashmir Solidarity Day: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे.

Manish Jadhav

Kashmir Solidarity Day: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे. पण तरीही तेथील जनता 5 फेब्रुवारीला काश्मीर एकता दिवस साजरा करणार आहे. या दिवशी, संपूर्ण पाकिस्तानमध्ये सार्वजनिक सुट्टी असेल आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर रॅली आणि कार्यक्रम आयोजित केले जातील.

दरम्यान, काश्मीर एकता दिवस साजरा करण्यासाठी पाकिस्तान सोशल मीडियावर भारताविरुद्ध खोटे व्हिडिओ शेअर करत आहे. विशेष म्हणजे, दिशाभूल करणाऱ्या प्रचारासाठी टूलकिट तयार करत असल्याच्याही बातम्या आहेत. पाकिस्तान अजूनही भारतविरोधी षडयंत्रासाठी पैसा खर्च करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मानवी श्रृंखला तयार करणार

जमात-ए-इस्लामीचे कार्यकर्ते पीओकेमधील प्रमुख रस्त्यांवर मानवी श्रृंखला तयार करतील. ते येथे रॅली, परिषदा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणार आहेत. जमात-ए-इस्लामी (JI) पक्षाचे कार्यकर्ते लाहोरमधील (Lahore) लिबर्टी चौक ते पंजाब असेंब्ली हॉलपर्यंत मोर्चा काढणार आहेत.

काश्मीर एकता दिवस साजरा करणार

पाकिस्तान (Pakistan) आणि आझाद काश्मीरमधील लोक दरवर्षी 5 फेब्रुवारीला काश्मीर एकता दिवस साजरा करतात. या दिवशी राजकीय पक्ष आणि संघटनांकडून सार्वजनिक चौक, प्रमुख मशिदी, प्रमुख रस्ते आणि विद्यापीठ परिसरातून रॅली काढली जाईल. यावेळी भारतीय उच्चायुक्तालयातूनही ही रॅली काढली जाण्याची शक्यता आहे.

परकीय चलन साठा शिल्लक नाही!

पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेकडे फक्त $3.09 अब्ज एवढी परकीय गंगाजळी उरली आहे. पाकिस्तानकडे फारसा पैसा शिल्लक नाही. दुसरीकडे, IMF ला पाकिस्तानची बजेट तूट भरुन काढायची आहे, त्यामुळे ते संपूर्ण देशाचे बजेट नियंत्रित करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT