See lock profile photo on Facebook  Dainik Gomantak
ग्लोबल

फेसबुकवरील लॉक प्रोफाइल पाहता येणार; जाणून घ्या

दैनिक गोमन्तक

एखाद्याचे फेसबुक (Facebook) प्रोफाइल पाहू इच्छिता? परंतु जर एखाद्या यूझर्सने (Facebook Users) त्याचे प्रोफाइल लॉक (Locked Profile) केले असेल तर आपण काय कराल? खरं तर, बरेचदा असे दिसून येते की बरेच लोक त्यांचे प्रोफाइल फेसबुकवर लॉक ठेवतात. लॉक केलेल्या प्रोफाइलमधून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट किंवा मेसेज आला की त्रास होतो. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही त्या यूझर्सचे प्रोफाईल बघायला जाता, तेव्हा लॉक पाहूनच डोके चक्रावून जाते. (See lock profile photo in this way on Facebook)

फेसबुकचे प्रोफाइल लॉकचा फीचर यूझर्सच्या गोपनीयतेसाठी आणले गेले आहे, परंतु काहीवेळा ते इतर यूझर्सला त्रास देते. मात्र, आता तुम्हाला फेसबुकच्या प्रोफाइल लॉक फीचरमुळे काळजी करण्याची गरज नाही. फेसबुकवर लॉक केलेले प्रोफाइल पाहणे आता खूप सोपे आहे. म्हणजेच, जर तुम्ही थोडे प्रयत्न केले तर तुम्ही लॉक केलेले प्रोफाइल पाहू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या टिप्स आणि युक्त्या पाळाव्या लागतील.

असे बरेच लोक आहेत जे इतरांच्या फेसबुक प्रोफाइलमध्ये गुपचूप डोकावतात. अशा लोकांपासून यूझर्सचे संरक्षण (Protection) करण्यासाठी, फेसबुकने लॉक केलेले प्रोफाइल फिचर लागू केले आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या फेसबुक आयडीसाठी लॉक केलेले प्रोफाइल निवडले तर तुमच्या मित्रांशिवाय इतर कोणताही युझर्स फोटो पाहू शकत नाही. या फिचरबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे कोणतीही अज्ञात व्यक्ती आपली पोस्ट आणि इतर माहिती पाहू शकत नाही. तसेच, तुमच्या लॉक केलेल्या प्रोफाइलचे स्क्रीनशॉट घेतले जाऊ शकत नाहीत. जर तुम्ही तुमच्या गोपनीयतेबद्दल बोलत असाल तर ते ठीक वाटते पण समस्या येते जेव्हा तुम्हाला लॉक केलेल्या प्रोफाइलमधून फ्रेंड रिक्वेस्ट येते. प्रोफाईल बघता येत नसल्यामुळे, विनंती स्वीकारण्यात खूप अडचण येते.

लॉक प्रोफाइल पाहण्याची युक्ती

फेसबुकवर लॉक केलेले प्रोफाईल पाहणे इतके अवघड नाही. लॉक केलेले प्रोफाइल पाहण्याचा पहिला मार्ग म्हणजे आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरील लॉक केलेल्या प्रोफाइलवर जाणे. त्यानंतर प्रोफाइल पिक्चरवर राईट क्लिक करा. आता कॉपी इमेज पत्ता वर टॅप करा. एक नवीन विंडो उघडा आणि त्यात URL पेस्ट करा. लॉक केलेल्या प्रोफाइलचा फोटो दाखवला जाईल.

या व्यतिरिक्त, लॉक केलेले प्रोफाइल पाहण्यासाठी दुसरा पर्याय आहे. लॉक केलेल्या प्रोफाइलचे यूझर्सचे नाव वाचा. आता 'http://graph.facebook.com/username/userid/Picture?width=2000&height=2000' वर जा आणि उझर्सच्यानावाच्या जागी नाव टाईप करा. प्रोफाइल फोटो दिसेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT