Mosquito  Dainik Gomantak
ग्लोबल

Mosquito Repellent Ring: शास्त्रज्ञांनी बनवली खास अंगठी, तुम्हीही म्हणाल क्या बात है!

Wearable Insect Repellent Ring: जर्मनीतील मार्टिन ल्यूथर युनिव्हर्सिटी (MLU) च्या शास्त्रज्ञांनी खास 3D प्रिंटेड रिंग तयार केली आहे.

दैनिक गोमन्तक

Mosquito Repellent 3D Printed Ring: जर्मनीतील मार्टिन ल्यूथर युनिव्हर्सिटी (MLU) च्या शास्त्रज्ञांनी खास 3D प्रिंटेड रिंग तयार केली आहे. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, ही अंगठी हातामध्ये घातल्यास डास आणि लहान कीटक बराच काळ दूर राहतात.' या प्रोजेक्टवर बरेच दिवस सुरु होते. या रिंगच्या प्रोटोटाइपमध्ये शास्त्रज्ञांच्या टीमने डासांना दूर ठेवण्यासाठी प्रभावी पदार्थ IR-3535 चा वापर केल्याचे विद्यापीठाचे प्राध्यापक एंड्रोश यांनी सांगितले.

जर्नल ऑफ फार्मास्युटिकल मध्ये प्रकाशित अहवाल

इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मास्युटिकल्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार (Research), शास्त्रज्ञांनी बायोडिग्रेडेबल पॉलिमरमधील डासांपासून बचाव करण्यासाठी विशेष 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर केला. खरं तर, या टीमचा फोकस अशा उत्पादनाच्या विकासावर होता, ज्याद्वारे डेंग्यू आणि मलेरिया पसरवणाऱ्या डासांना लोकांपासून दूर ठेवता येईल. या अंगठीचा प्रोटोटाइप तयार होण्यापूर्वी शास्त्रज्ञांच्या (Scientists) टीमने मॉस्किटो रिपेलेंट प्रोडक्ट म्हणून ब्रेसलेट बनवण्याचा विचारही केला होता.

रिंग 7 दिवस संरक्षण देईल

दरम्यान, ही अंगठी तयार करण्यासाठी खास थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, अंगठीमध्ये असलेला द्रव पदार्थ सामान्यतः स्प्रे किंवा लोशनच्या स्वरुपात वापरला जातो, जो अनेक तास डासांपासून संरक्षण देतो. अनेक प्रयोगांनंतर, शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला की, मानवी शरीराच्या 37 अंश तापमानात, या रिंगमध्ये असलेले द्रव पदार्थ संपण्यास एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागेल. म्हणजेच, ही अंगठी एकदा घातल्यानंतर 7 दिवस डासांपासून संरक्षण मिळते. त्याचबरोबर या रिंगची क्षमता वाढविण्याचे काम सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

SCROLL FOR NEXT