Salt  Dainik Gomantak
ग्लोबल

Stomach Cancer: सावधान! मिठामुळे होऊ शकतो पोटाचा कॅन्सर; काय सांगतंय संशोधन? वाचा

Salt Causes Cancer: मिठामुळे कर्करोग होतो ही बातमी वाचून तुम्हाला वाटेल की रोज खात असलेले मीठ सुद्धा किती घातक ठरु शकते.

Manish Jadhav

Salt Causes Stomach Cancer: मिठामुळे कर्करोग होतो ही बातमी वाचून तुम्हाला वाटेल की रोज खात असलेले मीठ सुद्धा किती घातक ठरु शकते. मीठ आपल्या आहारातील खूप महत्वाचा घटक आहे. पण, हा इशारा त्या लोकांसाठी आहे जे जास्त प्रमाणात मिठाचे सेवन करतात. होय, जर तुम्हीही जास्त मीठाचे सेवन करत असाल तर आतापासूनच सावध होण्याची गरज आहे.

गॅस्ट्रिक कॅन्सर जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात मिठाच्या हानिकारक प्रभावावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अभ्यासात युनायटेड किंगडम बायोबँकच्या 471,144 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आणि अन्नपदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण आणि पोटाचा कर्करोग होण्याचा धोका यांच्यातील दुव्याचा अभ्यास करण्यात आला.

वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड (WCRF) काय सांगते

वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडाने (WCRF) मिठामुळे होणाऱ्या कर्करोगाची माहिती फार पूर्वीच दिली होती. जास्त मीठ खाल्ल्याने पोटाचा कर्करोग (Cancer) होण्याची शक्यता 40 टक्क्यांनी वाढते, असे संघटनेने म्हटले होते. आता संशोधनात ही बाब समोर आली असल्याने सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे. म्हणूनच, एखाद्या व्यक्तीने किती मीठ खावे आणि कर्करोग होण्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. 2019 मध्ये द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालात असेही नमूद करण्यात आले होते की, जास्त मीठ खाल्ल्याने पोटाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

लोक दररोज 8.6 ग्रॅम मीठ खातात

वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडानुसार, लोक दररोज 8.6 ग्रॅम मीठ खातात. त्यानुसार लोक जास्त मीठ खात असल्याचे यावरुन दिसून येते. यामुळेच पोटाचा कर्करोग होण्याचा धोका संभवतो. मिठाचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास 14 टक्के म्हणजेच सुमारे 800 कर्करोगाचे रुग्ण कमी होऊ शकतात, असा विश्वासही संस्थेने व्यक्त केला आहे. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.

रोज किती मीठ खाणे योग्य

अशा स्थितीत प्रश्न पडतो की, आपण दररोज किती मीठ खावे? जेवणात दररोज सहा ग्रॅम मीठ आरोग्यासाठी चांगले असते. त्यानुसार जेवणात मीठ खाल्ल्यास पोटाच्या कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

जेवणात मीठ कमी खाण्यासाठी या सवयी लावा

  • जेवणात मीठ कमी घ्या.

  • मीठ वेगळे घेवून खाण्याची सवय थांबवा.

  • फास्ट फूड इत्यादींमध्ये मीठ जास्त असते, ते कमी खाणे किंवा बंद करणे.

  • सोडियमयुक्त पदार्थही खावेत.

  • कच्च्या भाज्या (सॅलड), फळे इत्यादींचे अधिक सेवन करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT