Indian Foreign Minister S Jaishankar Dainik Gomantak
ग्लोबल

S Jaishankar: ''गाझामध्ये जे काही चाललयं ते चिंताजनक, पण...''; इस्रायल-हमास युद्धावर UN मध्ये जयशंकर स्पष्टच बोलले

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे.

Manish Jadhav

Israel Hamas War:

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे. यातच आता, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले की, ''गाझामधील संघर्ष ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि त्यातून उद्भवलेल्या मानवतावादी संकटावर कायमस्वरुपी उपाय आवश्यक आहे.'' तसेच, गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी 'दहशतवाद आणि ओलीस ठेवणे' अस्वीकार्य असल्याचे म्हटले.

दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जिनिव्हा येथे आयोजित संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 55 व्या सत्रात डिजिटली भाग घेतला. "संघर्षांमुळे उद्भवलेल्या मानवतावादी संकटांना चिरस्थायी समाधानाची आवश्यकता असते ज्यामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्यांना दिलासा मिळू शकेल," असे ते म्हणाले. जयशंकर पुढे म्हणाले की, "त्याचवेळी, आपण हे स्पष्ट केले पाहिजे की दहशतवाद (Terrorism) आणि ओलिस ठेवणे अस्वीकार्य आहे. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचा नेहमीच आदर केला गेला पाहिजे."

परराष्ट्र मंत्र्यांनी पॅलेस्टाईन समस्येवर द्विराष्ट्र तोडगा निघावा या भारताच्या दीर्घकालीन भूमिकेचाही पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “संघर्ष प्रदेशात किंवा प्रदेशाबाहेर पसरु नये हे महत्त्वाचे आहे.” जयशंकर पुढे असेही म्हणाले की, "युद्धविरामाच्या प्रयत्नांमध्ये पॅलेस्टिनी लोक सुरक्षित सीमेत राहू शकतील अशा द्वि-राष्ट्र उपाय शोधण्यावर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे."

दुसरीकडे, इस्त्रायल आणि हमास (Hamas) यांच्यातील युद्धाचा भडका कमी होण्याचं नाव घेत नाहीये. गाझामधील नरसंहार आणि उपासमारीच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनचे पंतप्रधान मोहम्मद शतायेह यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गाझावासीयांचे हाल मला पाहावतं नाहीयेत असे म्हणत त्यांनी हे पाऊल उचलले, अशी टिप्पणी त्यांनी केली. दुसरीकडे, शतायेह यांच्या राजीनाम्यानंतर हमास सक्रिय झाला आहे. तो फतह पक्षासोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे, त्यासाठी पुढील महिन्यात मॉस्कोमध्ये बैठकही होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: दुचाकीस्वारावर झाड कोसळले

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT